Crime News |Goa News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: अल्‍पवयीन मुलीचा विनयभंग; तरुणास स्‍थानिकांकडून चोप

Crime News: हॉटेलच्या व्यवस्थापकासही मारहाण झाल्याची माहिती समोर आली

दैनिक गोमन्तक

Goa Crime News: बामणवाडा-शिवोली येथे ट्युशनसाठी जाणाऱ्या अल्पवयीन मुलीचा पाठलाग करत बिजॉय कुमार (22) या पश्चिम बंगाल येथील तरुणाने (सध्या राहाणारा पोर्तावाडा-शिवोली) विनयभंग केल्याची तक्रार मंगळवारी हणजूण पोलिसांत दाखल करण्‍यात आली आहे.

हा प्रकार उघडकीस आल्‍यानंतर प्रत्‍यक्षदर्शी काही नागरिकांनी संशयिताला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. संशयित हा शिवोली थिएटर जंक्शनवरील एका नामांकित चहाफराळाच्या हॉटेलात वेटर म्‍हणून काम करत आहे.

मंगळवारी सुट्टीवर असल्याने तो बाहेर पडला होता. संशयित आरोपी बिजॉय कुमारच्‍या बचावासाठी घटनास्थळी दाखल झालेल्या संबंधित हॉटेलच्या व्यवस्थापकासही मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे.

महिलेवर लैंगिक अत्याचार, गुन्हा नोंद

बार्देशमध्ये एका 50 वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली 53 वर्षीय संशयितावर पोलिसांनी गुन्हा नोंद केला. ही घटना 12 व 14 सप्टेंबर दरम्यान घडलेली. पीडिताने 21 नोव्हेंबर रोजी पोलिसांत याविषयी तक्रार दिली.

त्यानुसार पोलिसांनी भादंसंच्या 376 कलमान्वये गुन्हा दाखल केला. या तक्रारदार 50 वर्षीय पिडित महिलेचे संशयितासोबत मैत्रीचे नाते होते. याचा फायदा घेत संशयिताने वरील दिवशी एका हॉटेलमध्ये नेऊन पिडितेवर लैंगिक अत्याचार केला. पुढील तपास म्हापसा पोलिस करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT