Goa Crime News: मॉडेल बनविण्याचे आमिष दाखऊन बलात्कार करणाऱ्याला गुजरातमध्ये अटक

Goa Crime News: निरीक्षक संध्या गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली अटक करण्यात आली
Goa News | Goa Crime
Goa News | Goa CrimeDainik Gomantak

Goa Crime News: गुजरातमधील 20 वर्षीय तरुणीला मॉडेल बनविण्याचे स्वप्न दाखवून तिला गोव्यात बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गोवा पोलिसांनी गुजरात येथील हॉटेल व्यावसायिक अनंत कुमार ठक्कर (वय 47) याला तेथेच अटक केली.

त्याला गोव्यात आणून म्हापसा न्यायालयाने 6 दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. या पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार येथील महिला पोलिस स्थानकात त्याच्याविरुद्ध बलात्कार व मानवी तस्करीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

संशयित तरुणीची जबानी नोंदवून तसेच संशयितांविरुद्धचे ठोस पुरावे जमा करून गेल्या आठवड्यात महिला निरीक्षक संध्या गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली गोवा पोलिस पथक गांधीधाम - गुजरात येथे गेले होते.

तेथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने संशयिताचा शोध घेऊन त्याला अटक करण्यात आली. न्यायालयाकडून ट्रान्स्फर वॉरटं घेऊन आज रात्री उशिरा हे पथक गोव्यात पोचणार आहे. या प्रकरणामध्ये आणखी काहीजण अटक होण्याची शक्यता आहे.

महिला पोलिस स्थानकांच्या तपास अधिकारी संध्या गुप्ता यांनी या प्रकरणाचा तपास करताना कळंगुट येथील हॉटेलमधील सीसी टीव्ही फूटेज, हॉटेलचा रजिस्ट्रार तसेच त्या हॉटेलमधील कर्मचाऱ्यांच्या जबान्या नोंदवल्या आहेत.

पीडित तरुणीची एनजीओच्या उपस्थितीत नव्याने जबानी नोंदवण्यात आली आहे. तिने जबानीत संशयिताने तिला स्पा व्यवसायाची माहिती घेण्यासाठी गोव्यात बोलावले. विमानाची तिकीटही त्याने काढली होती.

Goa News | Goa Crime
Chhatrapati Shivaji Maharaj: शिवरायांना मानाचा मुजरा; महाराष्ट्रातील दोन तरुण अलिबागपासून कन्याकुमारीपर्यंत पायी चालणार

व्हिडिओची धमकी

संशयित अनंत कुमार याने गुजरात येथेही पीडित तरुणीला देहविक्री व्यवसायात ढकलले होते. त्याच्याकडे असलेल्या व्हिडिओची धमकी देऊन तो तिला देहविक्री करण्यास भाग पाडत होता. तिने भीतीपोटी ती संशयित बोलाविल तेथे जात होती व त्याचे ऐकत होती.

या देहविक्रीच्या व्यवसायातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला असता त्याने तिला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली त्यामुळे तिने गुजरातमध्ये एनजीओची मदत घेतली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com