parking dispute Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: गरोदर महिलेसह पतीला सळ्यांनी मारहाण करणाऱ्या तिघांना 5 दिवसांची कोठडी; पार्किंगच्या वादातून केला भीषण हल्ला

Pregnant woman attacked Goa: बास्तोडा जंक्शन एका क्षुल्लक पार्किंगच्या कारणावरून २५ जणांच्या टोळक्याने एका दाम्पत्याला बेदम मारहाण केली

Akshata Chhatre

म्हापसा: काही दिवसांपूर्वी गोव्यातील नास्नोळा येथून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली होती. बास्तोडा जंक्शन येथे सोमवारी रात्री (२ जून) एका क्षुल्लक पार्किंगच्या कारणावरून २५ जणांच्या टोळक्याने एका दाम्पत्याला बेदम मारहाण केली. या घटनेतील धक्कादायक बाब म्हणजे, मारहाण झालेल्या श्रुती शिरोडकर या गरोदर असतानाही त्यांना गंभीरपणे मारहाण करण्यात आली, ज्यामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

तिघांना ५ दिवसांची पोलीस कोठडी

या प्रकरणी म्हापसा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी या घटनेतील प्रमुख आरोपी असलेल्या मोईरा येथील रहिवासी रंगनाथ शेट्ये (वय ५५), विनोद शेटकर (वय ४७) आणि कौशल शेट्ये (वय ३२) या तिघांना अटक केली असून, त्यांना ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. म्हापसा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

नेमके काय घडले?

विवेक आणि श्रुती शिरोडकर हे दाम्पत्य शॉरमाची गाडी लावून व्यवसाय करतात. बास्तोडा जंक्शन येथे सोमवारी रात्री आठच्या सुमारास पार्किंगच्या किरकोळ कारणावरून शिरोडकर दाम्पत्य आणि काही संशयितांमध्ये वाद झाला. या वादादरम्यान संशयितांनी विवेक यांना धमकी दिली होती.

यानंतर सायंकाळी शिरोडकरांनी आपली शॉरमाची गाडी सुरू केली. त्याचवेळी, सुमारे २५ जणांचे टोळके हातात लाकडी दांडके, लोखंडी सळ्या आणि धारदार शस्त्रे घेऊन बास्तोडा जंक्शन येथे आले. या टोळक्याने व्हॅनमधून विवेक यांना खाली ओढत मारहाण करण्यास सुरुवात केली.

विवेक यांना वाचवण्यासाठी त्यांची पत्नी श्रुती धावून आल्या असता, त्यांनाही बेदम मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात विवेक आणि श्रुती या दोघांनाही गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना पुढील वैद्यकीय तपासणीसाठी अझिलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mitchell Starc Fight: लाईव्ह सामन्यात 'रनिंग लाईन'वरुन राडा! मिचेल स्टार्क मेहदी हसन मिराजशी भिडला; हाय-व्होल्टेज ड्रामा व्हायरल

Goa Olympic Association: 'गोवा ऑलिंपिक'ला 21 वर्षांनंतर लाभणार नवा सचिव, गुरुदत्त भक्ता यांची दोन दशकांची कारकीर्द; महत्त्वाच्या स्पर्धांचे राज्यात आयोजन

Shukra Pushkaransh Yog 2026: शुक्रदेवांची अफाट कृपादृष्टी! 15 ऑगस्टपासून 'या' राशींच्या नशिबाला मिळणार नवी दिशा; 'शुक्र पुष्करांश' योग करणार मालामाल

Calangute Dance Bar: कळंगुटमधील 'डान्स बार' बंद करा, गट काँग्रेस समितीची मागणी; पोलिसांना निवेदन सादर

Child Disappearance Goa: राज्यात पाच वर्षांत हरवली 256 मुले, 106 सापडली,150 बेपत्ता

SCROLL FOR NEXT