Court  Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: त्या घटनेनंतर रात्री झोपही लागत नाही, पीडितेने कोर्टात मांडली व्यथा; आरोपीच्या जामिनाबाबत काय निर्णय दिला?

POCSO Court: महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या पश्‍चिम बंगाल येथील संशयित आरिफ मुंशी याचा जामीन अर्ज जलदगती न्यायालयाने (पोक्सो) फेटाळला.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa News: राज्यातील एका गेस्ट हाऊसमधील खोलीत प्रवेश करून झोपेत असलेल्या महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या पश्‍चिम बंगाल येथील संशयित आरिफ मुंशी याचा जामीन अर्ज जलदगती न्यायालयाने (पोक्सो) फेटाळला. तपासकाम अजून पूर्ण झालेले नाही, त्यामुळे संशयित पीडित महिलेला धमकावण्याचा, तपास कामात अडथळे आणण्याचा किंवा आमिष दाखवण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे निरीक्षण आदेशात न्यायालयाने केले आहे.

पीडित महिलेवरील बलात्कारप्रकरणी हणजूण पोलिसांनी संशयित आरिफ मुंशी याला २८ सप्टेंबर २०२४ रोजी अटक केली होती. त्याच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला गुन्हा खोटा आहे. अटक केल्यापासून तो कोठडीत आहे. तो मूळचा पश्‍चिम बंगाल येथील असून उदरनिर्वाहासाठी त्याचे कुटुंब त्याच्यावर अवलंबून आहे. तो फरारी होण्याची शक्यता नाही. न्यायालयाने जामीन दिल्यास आदेशातील अटींचे पालन केले जाईल, तसेच स्थानिक हमीदारही सादर केला जाईल, अशी बाजू संशयिताच्या वकिलांनी मांडली.

पोलिसांनी जामिनाला विरोध करताना तपासकाम प्राथमिक टप्प्यात आहे. आणखी काही साक्षीदारांच्या जबान्या नोंदवायच्या आहेत. तो पश्‍चिम बंगाल येथील असल्याने तो जामीन मिळाल्यावर खटल्यावरील सुनावणीवेळी उपस्थिती लावणार नाही. त्यामुळे त्याला जामीन दिला जाऊ नये अशी बाजू सरकारी पोलिसांनी मांडली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

New GST Rates: गोव्‍यातील कॅसिनो उद्योगासाठी धक्‍का! जीएसटी 40 टक्‍के; पर्यटन, इतर व्यवसायांना फटका बसण्याची शक्यता

Usgao Theft: दार तोडले, महिलेच्या तोंडात कोंबला बोळा! पालवाडा-उसगावात चोरांचा धुमाकूळ; 4 लाखांचा ऐवज लंपास

Rashi Bhavishya 04 September 2025: खर्च वाढू शकतो, विद्यार्थ्यांना यशाची संधी; कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचा पाठिंबा

New GST Rate: जीएसटी कॉन्सिलचा मोठा निर्णय! आता फक्त 5 आणि 18 टक्के दोनच कर; काय होणार स्वस्त? वाचा सविस्तर

Goa Politics: 'मग तुम्हीच तो DPR जनतेसमोर आणा!’ मुरगाव बंदरातील कोळसा वाहतुकीवरुन अमित पाटकरांचं सुदिन ढवळीकरांना थेट आव्हान

SCROLL FOR NEXT