पणजी: गोव्यातील पोक्सो न्यायालयाने दिलेल्या एका निर्णयात १७ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या दोन पुरुषांना जामीन मंजूर केला आहे. पीडित मुलीने स्वतः त्यांच्या जामीन निर्णयावर संमती दिल्याने हा निर्णय घेण्यात आला. पीडित मुलीची गर्भधारणा झालेला काळ आणि तिच्यावर जबरदस्ती केल्याबाबतचे पुरावे कमकुवत असल्यामुळे दोन्ही संशयितांना न्यायालयाने जमीन मंजूर केला आहे.
काही दिवसांपूर्वी पीडित मुलीच्या आईने नोंदवलेल्या तक्रारीनुसार, जानेवारी २०२४ पासून दोन्ही संशयितांनी पीडित मुलीवर केलेल्या लैंगिक अत्याचारामुळे ती गरोदर राहिली आहे. मात्र, पीडित मुलीने न्यायालयाला दिलेली माहिती काहीतरी औरच होती.
तिने न्यायालयाला दिलेल्या माहितीनुसार तिचे पहिल्या आरोपीसह वर्ष २०२३ मध्ये जुने संबंध होते, त्यानंतर दुसऱ्या आरोपीसह देखील १५ दिवस संबंध असल्याचे तिने मान्य केले आहे. धक्कादायक बाब म्हणजे दुसरा आरोपी तिच्याच आईचा प्रियकर असल्याची माहिती देखील उघड झालीये. पीडित मुलीने बाळाला जन्म देण्याची इच्छा सुद्धा न्यायालयात व्यक्त केली आहे.
न्यायालयात सादर करण्यात आलेल्या माहितीनुसार, कथित बलात्काराची घटना जानेवारी २०२४ मध्ये घडले असताना पीडितेची गर्भधारणा, अंदाजे पाच महिन्यांची आहे, बहुधा मार्च २०२४च्या आसपास असण्याची शक्यता आहे आणि यामुळे फिर्यादीने सादर केलेल्या पुराव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण होते. शिवाय दोन्ही आरोपींच्या विरोधात जबरदस्ती केल्याचे आरोप नाहीत.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश अपूर्वा नागवेनकर, जलदगती विशेष न्यायालय, पणजी (POCSO) च्या पीठासीन अधिकारी यांनी सांगितले की पीडितेला आरोपींच्या जामिनावर कोणताही आक्षेप नसल्यामुळे आरोपीला कोठडीत ठेवणे व्यर्थ आहे. फिर्यादीने १३ साक्षीदारांची यादी न्यायालयासमोर ठेवली असून अद्याप आरोपी स्पष्ट होणं बाकी आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.