Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: गोवा हादरला! आधी पैशांचं आमिष, मग अत्याचार अन् मारहाण; 60 वर्षीय नराधमाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Goa crime news Panaji: गोव्याची राजधानी पणजीमध्ये एका ६० वर्षीय वृद्धाने १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.

Sameer Amunekar

पणजी: गोव्याची राजधानी पणजीमध्ये एका ६० वर्षीय वृद्धाने १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पणजी पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपीला अटक केली आहे. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला असून, या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

पैशांचे आमिष दाखवून शोषण आणि धमकावण्याचा प्रकार

मिळालेल्या माहितीनुसार, ६० वर्षीय आरोपीने या अल्पवयीन मुलीला पैशांचे आमिष दाखवले होते. या आमिषाला बळी पाडून त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. इतकेच नाही तर, नराधमाने मुलीला मारहाण करून तिला या प्रकाराबाबत कोणालाही न सांगण्यासाठी धमकावले होते. तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, आरोपीने पीडितेसोबत अत्यंत अश्लील आणि गैरवर्तन केले होते.

पोलीस कारवाई

पीडित मुलीच्या आईने धैर्याने पुढे येत पणजी पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने गुन्हा नोंदवला. भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो (POCSO) कायद्याच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

पुढील तपास सुरू

अटक करण्यात आलेल्या आरोपीला पणजी येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी (JMFC) न्यायालयात हजर केले जाणार आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये गुंतलेल्या आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी सामाजिक स्तरातून होत आहे. अल्पवयीन मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न या निमित्ताने पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT