Goa Murder Case Dainik Gomantak
गोवा

Goa Murder Case: गोव्यात दोन दिवस खुनांचे सत्र, तीन परप्रांतयांनी गमावले जीव

दोन प्रकरणांना अनैतिक संबंधांची किनार

दैनिक गोमन्तक

Goa Murder Case: गेल्या दोन दिवसांत तीन परप्रांतीयांच्या खुनाच्या घटनेने राज्य हादरले. डिचोली आणि फातोर्डा येथे मंगळवारी रात्री आणि बाणस्तारी येथे साेमवारी या खुनाच्या थरारक घटना घडल्या.

मृतांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. डिचोली आणि बाणस्तारी येथील प्रकरणांना अनैतिक संबंधांची किनार असून याप्रकरणी एका महिलेसह संशयिताला अटक केली आहे.

महिलेच्या खूनप्रकरणी संशयिताने पोलिसांसमोर खुनाची कबुली दिली आहे.

माडेल-फातोर्डा येथे बांधकामाच्या ठिकाणी एका कामगाराचा डोक्यात दगड घालून त्याचा खून केला गेल्याचे समोर आले आहे. हा मृतदेह कुणाचा आहे, याची माहिती पोलिसांना मिळालेली नाही. या प्रकरणात एका कामगारावर संशय व्यक्त केला जात आहे.

दारूच्‍या नशेत भांडण झाल्‍याने हा खून झाला असावा, असा प्राथमिक आहे. मृतदेहाच्‍या शेजारी दारूचे रिकामे ग्‍लास सापडल्‍याने पोलिसांनी हा तर्क व्‍यक्‍त केला आहे. मृत कामगार परप्रांतीय असून त्याची ओळख अद्याप पटलेली नाही.

फातोर्डा पोलिसांनी संशयित कामगाराला अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे. फातोर्डा पोलिस स्थानकाचे निरीक्षक धितेंद्र नाईक हे याप्रकरणी तपास करत आहेत.

डिचोली : ‘सेतू संगम’वर युवकाचा निर्घृण खून

पत्नीसह साडूला अटक : अनैतिक संबंधांतून हत्येचा अंदाज

शहरातील ‘सेतू संगम’प्रकल्पस्थळी रमेश पोशालप्पा सिद्धागोळी (३९,रा.मूळ हुक्केरी-बेळगाव) या युवकाचा निर्घृणपणे खून करण्याची घटना घडली आहे.

पोलिसांनी आठ तासांत खून प्रकरणाचा छडा लावून मृत युवकाच्या पत्नीसह साडू या दोघा संशयितांच्या मुसक्या आवळल्या.

मूळ महाराष्ट्रातील संगीता रमेश सिद्धागोळी (२९) आणि रामू शंकर गवळी (५०,रा.कैलासनगर-अस्नोडा ) अशी संशयितांची नावे आहेत.

पळून जाण्याच्या तयारीत असताना थिवी रेल्वे स्थानकावर पोलिसांनी त्यांना जेरबंद केले.हा खून अनैतिक संबंधातून झाला असावा,असा पोलिसांचा अंदाज आहे.

प्राप्त माहितीनुसार खुनाचा हा प्रकार आज (बुधवारी) सकाळी हा प्रकार उघडकीस आला असला, तरी काल मध्यरात्री हा खून झाल्याचा अंदाज आहे.

रमेश सिद्धागोळी हा गेल्या काही महिन्यांपासून डिचोलीत राहत होता, अशी माहिती पुढे आली आहे. हा खून नेमका कशासाठी झाला, ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. तरी अनैतिक संबंधातून हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

आठ तासांत छडा

डिचोलीचे पोलिस उपअधीक्षक सागर एकोस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली डिचोलीचे पोलिस निरीक्षक राहूल नाईक आणि वाळपईचे पोलिस निरीक्षक दिनेश गडेकर यांनी त्वरित तपासाला योग्य दिशा देऊन आठ तासांच्या आत खुनाचा छडा लावण्यात यश मिळवले.

याकामी सहायक पोलिस उपनिरीक्षक मुकुंद पळ आदी पोलिस पथकाने मदतकार्य केले. महिला पोलिसांनीही महत्वाची कामगिरी केली.

तीक्ष्ण हत्याराने वार

ज्या युवकाचा खून झाला आहे, तो युवक एका महिलेसमवेत शहरात भंगार गोळा करीत होता. या दोघांनीही ‘सेतू संगम’स्थळी बिऱ्हाड थाटले होते. रात्री दोघेही सेतू संगमवर आसरा घेत होते,अशी माहिती मिळाली आहे.

सेतू संगमवर रमेश सिद्धागोळी याचा मृतदेह नग्नावस्थेत होता आणि त्याच्या पाठीवर वार केल्याच्या खुणा होत्या. गुप्तांगाजवळही जखमा होत्या. तीक्ष्ण हत्याराने त्याचा खून केल्याचा संशय आहे.

दारूच्या नशेत झालेल्या वादातून हा खून झाल्याचा संशय आहे. माहिती मिळताच डिचोली पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. दुपारी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोमेकॉत पाठवला आहे. फॉरेन्सिक विभागाच्या तज्ज्ञ पथकाने घटनास्थळी येऊन पुरावे गोळा केले आहेत.

अडीच वर्षातील तिसरा खून : खुनाची आजची घटना धरून गेल्या अडीज वर्षात डिचोली परिसरात घडलेली खुनाची तिसरी घटना आहे. दीड वर्षांपुर्वी बंदरवाडा येथे डोक्यात दगड घालून एका युवकाचा निर्दयीपणे खून करण्यात आला होता. तर गेल्यावर्षी मार्च महिन्यात रोलिंगमिल-वाठादेव परिसरात एका यूपीमधील नागरिकाने आपल्या पत्नीला ठार केले होते.

बाणस्तारी : नवऱ्यानेच संपवले बायकोला

संशयिताला अटक : अनैतिक संबंधातून खून केल्याची कबुली

बाणस्तारी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या एका गाड्याच्या शेडमध्ये महिलेचा मृतदेह सापडला. हा खुनाचा प्रकार असल्याचे स्पष्ट झाले असून महिलेचे नाव संजुदेवी भुईया (वय ४६) असे असून या महिलेच्या खूनप्रकरणी तिचा पती मुन्ना भुईया (वय ४६) याला म्हार्दोळ पोलिसांनी अटक केली आहे.

दोघेही मूळ झारखंड येथील असून रोजगारानिमित्त बाणस्तारी येथे राहत होते. मुन्ना भुईया याने खुनाची कबुली दिली असून संजुदेवीचे आधीच्या पतीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून हा खून झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

हा खुनाचा प्रकार गेल्या सोमवारी दुपारी घडला. मुन्ना भुईया व त्याची पत्नी संजुदेवी ही मजूर असून रोजंदारीवर मिळेल ते काम करीत होती. या दांपत्याला बारा व सात वर्षांची दोन मुले आहेत.

भुईया कुटुंबाचे बाणस्तारी येथील जुन्या मार्केट प्रकल्पाच्या शेडमध्ये वास्तव्य आहे. अधूनमधून मुन्ना व संजुदेवी बाणस्तारी येथील रस्त्याच्या कडेला असलेल्या एका बंद गाड्याच्या शेडमध्येही राहत होती.

सोमवारी दुपारी संजुदेवी व मुन्ना यांच्यात भांडण झाले, त्यात मुन्नाने तिचा दुपट्ट्याने गळा आवळला.तिचा मृत्यू झाल्यामुळे घाबरलेल्या मुन्नाने मृतदेह शेडमध्ये तसाच ठेवला. दरम्यान, संध्याकाळी दोन्ही मुलांनी येऊन आईची चौकशी मुन्नाकडे केली असता, त्याने ती ओळखीच्यांकडे गेल्याचे सांगितले व मुलांना मार्केट शेडमध्ये परत पाठवले. म्हार्दोळ पोलिसांनी संजुदेवीचा मृतदेह ताब्यात घेऊन तेथेच असलेल्या मुन्नाला संशयावरून ताब्यात घेतले असता, त्याने खुनाची कबुली दिली.

दोघांचेही दुसरे लग्न

संजुदेवी व मुन्ना या दोघांचेही हे दुसरे लग्न आहे. संजुदेवीला पहिल्या पतीने सोडले असून मुन्नालाही त्याच्या पहिले पत्नीने सोडले आहे. मुन्ना हा मूळ झारखंडचा असून गोव्यात येण्यापूर्वी त्याची संजुदेवीशी ओळख झाली, आणि त्यानंतर दोघांनीही लग्न केले. त्यांना दोन मुले आहेत.

अनैतिक संबंधामुळे व्हायचे दोघांत वाद

संजूदेवी व मुन्ना यांचे लग्न झाल्यास बारा वर्षे झाली असली तरी संजुदेवीचे आधीच्या पतीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय मुन्नाला आला होता. या संशयावरूनच मुन्ना व संजुदेवी यांच्यात भांडणे होत होती. खून करण्यापूर्वीही त्यांच्यात भांडण झाले, त्यातच रागाच्या भरात मुन्नाने संजूदेवीचा गळा आवळल्याचे स्पष्ट झाले आहे.

मुलांमुळे घटनेची वाच्यता : सोमवारी मुन्नाने मुलांना संजुदेवी ओळखीच्यांकडे गेली असे सांगितले होते. मंगळवारी पुन्हा मुलांनी मुन्नाकडे आईची चौकशी केली असता, शेवटी मुन्नाने शेडमध्ये निपचित पडलेल्या संजुदेवीकडे बोट दाखवले. त्यानंतर या प्रकरणाची वाच्यता झाली. संजुदेवीचा मृत्यू झाल्याचे भुईया कुटुंबाच्या निकटवर्तीयांना समजल्यानंतर म्हार्दोळ पोलिसांत याबाबतची माहिती देण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT