Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: बेपत्ता सुरक्षा रक्षकाचा मृतदेह पिळगाव येथे नदीत आढळला, मृतदेह बाहेर काढण्यात डिचोली अग्निशमन दलाला यश

Bicholim: भर दिवाळीच्या दिवशी बेपत्ता झालेल्या डिचोलीतील सुवर्ण दत्ता गोवेकर (वय ४५) याचा मृतदेह अखेर आज पिळगाव येथे मांडवी नदीत आढळून आला.

गोमंतक ऑनलाईन टीम

डिचोली: भर दिवाळीच्या दिवशी बेपत्ता झालेल्या डिचोलीतील सुवर्ण दत्ता गोवेकर (वय ४५) याचा मृतदेह अखेर आज पिळगाव येथे मांडवी नदीत आढळून आला. शोध मोहीम हाती घेतल्यानंतर आज दुपारी हा मृतदेह डिचोली अग्निशमन दलाच्या जवानांच्या हाती लागला. त्याने नदीत उडी मारून आत्महत्या केली असावी असा संशय आहे. मृत सुवर्ण हा आतीलपेठ-डिचोली येथील रहिवासी होता. तो मानव संशोधन विकास महामंडळात सुरक्षा रक्षक म्हणून कामाला होता.

मृतदेह बाहेर काढल्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून वैद्यकीय तपासणीसाठी तो बांबोळी येथे पाठवून दिला. अग्निशमन दलाचे लिडींग फायर फायटर महादेव गावस यांच्या नेतृत्वाखाली रामदास परब (चालक ऑपरेटर), विशांत वायंगणकर, युवराज गावकर, राकेश मातोणकर आणि रुपेश गावस यांनी शोध मोहिमेत भाग घेतला होता.

सुवर्ण हा काल (सोमवारी) दिवाळीच्या दिवशी घरातून बेपत्ता झाला होता. सायंकाळपासून त्याचे नातलग त्याचा शोध घेत होते. याप्रकरणी पोलिसात तक्रारही करण्यात आली होती. दरम्यान, सुवर्ण याच्या मोबाईलवर संपर्क केला असता, पिळगावपर्यंत लोकेशन मिळाले.

त्यानंतर पिळगाव येथे जाऊन शोध घेतला असता, पिळगाव येथील मांडवी नदीकाठी असलेल्या जेटीवर त्याचे चप्पल तसेच जवळपास स्कुटर आणि डिकीमध्ये मोबाईल आढळून आला. त्यामुळे तो नदीत बुडाला असावा अशी शक्यता वाढली होती. आज (मंगळवारी) सकाळी किनारी पोलिस दल आणि नंतर डिचोलीच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी मोटार बोटीद्वारे नदीत शोध सुरू केला असता दुपारी सुवर्ण याचा मृतदेह अग्निशमन दलाच्या जवानांच्या हाती लागला.

एकोशीत महिलेचा मृतदेह

साल्वादोर-द-मुंद पंचायत क्षेत्रात एकोशी येथे नदीत तरंगणारा एका महिलेचा मृतदेह आज सापडला अग्निशमन दलाच्या जवानांनी तो बाहेर काढला. सायंकाळपर्यंत त्या मृतदेहाची ओळख पटली नव्हती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bengaluru Crime: 24 वर्षांचा आनंद अवघ्या 4 महिन्यात विरला, पोटच्या जुळ्या मुलींची आईनेच केली हत्या; बंगळुरुतील घटनेनं हादरला देश

Goa Law And Order: आकड्यांचा सलाम!

Goans Surrender Passports: रोज सरासरी 5 गोमंतकीय पासपोर्ट करतात सरेंडर; 3.5 वर्षांत तब्बल 6,960 जणांनी पासपोर्ट सोडला

Diamond Robbery: 380000000 चा 200 कॅरेटचा हिऱ्यांचा हार लंपास, 95 वर्षांचा शाही इतिहास! ऑस्ट्रियातील घटनेनं खळबळ; इंटरपोलकडून चोरट्यांचा शोध सुरु

Goa PSC Chairman Appointment: 'गोवा लोकसेवा' अध्यक्ष नियुक्तीला हायकोर्टात आव्हान; राज्य सरकारसह उदयसिंह रावराणे यांना नोटीस

SCROLL FOR NEXT