Goa Crime: सांकवाळ येथे फ्लॅट फोडून साडेआठ लाखांचा ऐवज लंपास, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

Sancoale Theft: झुआरीनगर-सांकवाळ येथील फ्लॅट फोडून अज्ञात चोरट्यांनी साडेआठ लाखांचा ऐवज लंपास केला.
Goa Crime
Goa CrimeDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: झुआरीनगर-सांकवाळ येथील फ्लॅट फोडून अज्ञात चोरट्यांनी साडेआठ लाखांचा ऐवज लंपास केल्याची तक्रार गांधीनगरमांगोरहिल येथील राज दुलारी राणा यांनी १९ ऑक्टोबरला वेर्णा पोलिस स्थानकात केली आहे. याप्रकरणी वेर्णा पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा फ्लॅट बंद होता. या संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी ९ सष्टेंबरच्या दुपारी साडेतीन ते १८ ऑक्टोबरच्या सायंकाळी ५ वा. या दरम्यानच्या काळात फ्लॅट फोडला.

Goa Crime
Goa Politics: "आम्हाला कोणी बोलावलंच नाही",फातोर्डा मेळाव्यावर पालेकरांचा खुलासा; 'आप'शिवाय विरोधी पक्षांची एकजूट?

फ्लॅटच्या मुख्य दरवाजातून अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून ४०.१८० ग्रॅमच्या दोन बांगड्या, ३० ग्रॅमचे एक मंगळसूत्र, ७.५ ग्रॅम दोन अंगठ्या, ७.५ ग्रॅमची कर्णफुले असे सोन्याचे दागिने व दोन मनगटी घड्याळे चोरून नेली. या सर्व ऐवजाची किंमत साडेआठ लाख रुपये होते.

Goa Crime
Goa Rain: ऐन दिवाळीत 'बळीराजा' संकटात! हातातोंडाशी आलेला घास पाण्यात; 5 दिवसांसाठी Yellow Alert जारी

दरम्यान, राज दुलारी राणा या १९ ऑक्टोबरला फ्लॅटकडे आल्या असता, त्यांना फ्लॅट फोडल्याचे दिसून आले. याप्रकरणी पोलिस निरीक्षक आनंद शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महेश भोमकर पुढील तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com