Assaulted in Margao Dainik Gomantk
गोवा

Goa Crime: मडगावात गर्लफ्रेंडची छेडछाड, बॉयफ्रेण्डला मारहाण; एका आरोपीला अटक

Goa Crime News: मडगावात एका महिलेची छेडछाड आणि तरुणाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली

Akshata Chhatre

मडगाव: मडगाव येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. मडगावात एका महिलेची छेडछाड आणि तरुणाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी कोलवा पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली असून, कोलवा पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे व त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बोर्डा, मडगाव आणि चौगुले कॉलेजजवळ राहणाऱ्या तीन व्यक्तींनी एका तरुणाच्या गर्लफ्रेंडबद्दल अपमानास्पद टिप्पणी केली. या तरुणाने विरोध केल्यावर तिघांकडून त्याला मारहाण करण्यात आली. आरोपींनी महिलेबद्दल अपमानास्पद शब्दोच्चार करून तिची छेड काढली असा आरोप आहे.

तरुणाने त्याच्या मैत्रिणीचा बचाव करण्याचा प्रयत्न केला असता तरुणाला लाथा-बुक्क्यांनी तसेच एका कुंड्याचा वापर करून मारहाण करण्यात आली, ज्यात त्याला गंभीर दुखापत झाली आहे. आरोपींनी त्याला गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशा धमक्या देखील दिल्या आहेत.

पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी तातडीने कारवाई करत एका आरोपीला अटक केली आहे. आरोपीला मडगाव न्यायालयात हजर केले असता, त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे आणि इतर दोन आरोपींचा सध्या पोलीस शोध घेत आहेत. पोलीस हवालदार संदेश एम. गडकर या प्रकरणाचा तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT