Mapusa POCSO Court Verdict Dainik Gomantak
गोवा

Goa Minor Girl Molestation: मॉडेलिंगचे आमिष आणि अश्लील चाळे! अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 3 वर्षांची शिक्षा

Mapusa POCSO Court Verdict: बसमध्ये १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिचा छळ करणारा डिग्सन लोबो (४९) याला येथील विशेष पोक्सो न्यायालयाने दोषी ठरवत ३ वर्षांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: बसमध्ये १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिचा छळ करणारा डिग्सन लोबो (४९) याला येथील विशेष पोक्सो न्यायालयाने दोषी ठरवत ३ वर्षांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच विविध कलमांखाली दंडही ठोठावला. दंडाची संपूर्ण रक्कम पीडितेला भरपाई म्हणून देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.

ही घटना १६ डिसेंबर २०२४ रोजी म्हापसा कदंब बसस्थानक परिसरात घडली होती. पीडित मुलगी शाळेतून घरी जात असताना आरोपी तिच्या शेजारी येऊन बसला. मॉडेलिंगची संधी देण्याचे आमिष दाखवत त्याने तिच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. त्‍यानंतर आरोपीने तिच्यासमोर अश्लील चाळे करत तिचा विनयभंग केला. याप्रसंगी पीडित मुलीने प्रसंगावधान राखत तातडीने आपल्या भावाला फोन करून घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर ती बसमधून उतरली व आरोपीची ओळख पटवली.

पुढे पीडितेच्या भावाने आणि नातेवाईकांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले होते. विशेष न्यायालयाच्या न्यायाधीश डॉ. पूजा कवळेकर यांनी निकाल देताना नमूद केले की, सरकारी पक्षाने पीडितेचे वय तसेच घटनेतील वस्तुस्थिती यशस्वीपणे सिद्ध केली आहे. तपास प्रक्रियेत काही त्रुटी असल्या तरी त्यावरून पीडितेची विश्वासार्ह साक्ष नाकारता येणार नाही. तिने अत्यंत धैर्याने या कठीण प्रसंगाचा सामना केला आणि आरोपीला पकडून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. अशा स्वरूपाच्या गुन्ह्यात आरोपीला केवळ नावापुरती शिक्षा देणे न्यायाच्या उद्देशाला हरताळ फासणारे ठरेल.

न्यायालयाने आरोपीला पोक्सो कायदा कलम ८ अंतर्गत ३ वर्षे कारावास आणि २० हजार रुपये दंड ठोठावला. शिवाय भारतीय न्याय संहिता कलम ७५ अंतर्गत २ वर्षे कारावास व १० हजार रुपये दंड, बीएनएस कलम ७८ अंतर्गत २ वर्षे कारावास व १० हजार रुपये दंड, बीएनएस कलम ७९ अंतर्गत २ वर्षे कारावास व १० हजार रुपये दंड आणि पोक्सो कायदा कलम १२ अंतर्गत २ वर्षे कारावास व १० हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आली

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT