Subhash Naik Murder Case Dainik Gomantak
गोवा

Subhash Naik Murder Case: सुभाष नाईक यांचा खूनच! पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या, प्रकरणाला नाट्यमय वळण; बारमधील सीसीटीव्हीचा ‘डीव्हीआर’ही जप्त

Mapusa Police Arrest Murder Suspects: कुचेली येथील ६३ वर्षीय सुभाष नाईक यांचा मृत्यू सुरुवातीला नैसर्गिक वाटत असला, तरी शवविच्छेदन अहवाल आणि पोलिस तपासानंतर या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

म्हापसा: कुचेली येथील ६३ वर्षीय सुभाष नाईक यांचा मृत्यू सुरुवातीला नैसर्गिक वाटत असला, तरी शवविच्छेदन अहवाल आणि पोलिस तपासानंतर या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले आहे. म्हापसा पोलिसांनी याप्रकरणी दोन संशयितांना खुनाच्या आरोपाखाली अटक केली आहे.त्यांना ६ दिवासांची कोठडी देण्यात आली.

पोलिसांनी पुढील तपासासाठी नाईक यांचा ‘व्हिसेरा’ जतन करून ठेवला आहे. तसेच त्यांनी मृत्यूपूर्वी भेट दिलेल्या बारमधील ‘सीसीटीव्ही’चा ‘डीव्हीआर’ जप्त केला असून, तपासात महत्त्वाचे पुरावे हाती लागले आहेत. म्हापसा पोलिसांनी प्राथमिक पुराव्यांच्या आधारे कुचेली येथील ॲरॉन फर्नांडिस (वय २२) आणि रामप्रसाद गुईन (वय ४३) या दोघांना अटक केली आहे. पोलिस तपासात असे समोर आले आहे की, संबंधित बारस्थळी नाईक यांना जबर मारहाण करण्यात आली होती.

संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी सुरू असून, गुन्ह्यात वापरलेली शस्त्रे जप्त करणे आणि घटनाक्रमाची पुनर्रचना करण्यासाठी त्यांना अटक करण्यात आली आहे.

शवविच्छेदन अहवालात धक्कादायक बाबी उघड

शनिवारी (ता. २ मे) प्राप्त झालेल्या शवविच्छेदन अहवालात नाईक यांच्या शरीरावर गंभीर जखमा आढळल्या. डोक्याच्या कवटीला इजा, नाक व छातीच्या बरगड्या मोडणे यांसह अनेक अंतर्गत जखमांचा समावेश आहे. जखमांचे स्वरूप पाहता हा मृत्यू नैसर्गिक नसून क्रूर मारहाणीचा परिणाम असल्याचे स्पष्ट झाले आहे.

वैद्यकीय व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शनिवारी नाईक यांचा मृतदेह पुन्हा घरी आणण्यात आला. यावेळी कुचेली गावात शोककळा पसरली होती. अत्यंत जड अंतःकरणाने आणि शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Star Cricketer Retirement: ''मी लढाई हरलो...'', स्टार वेगवान गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ठोकला रामराम; सततच्या दुखापतींना कंटाळून घेतला मोठा निर्णय

Asian Games Final 2026: अजिंक्य टीम इंडियाची 'गोल्ड' कामगिरी! फायनलमध्ये भारतीय पोरींनी श्रीलंकेला 147 धावांनी लोळवलं; एशियन गेम्समध्ये भारताचा डंका

Women Cancer Symptoms : महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग कोणता? 'ही' लक्षणं दिसल्यास वेळीच तपासणी करा

Goa Ranji 2026: गोव्याच्या रणजी संघाची तयारी अंतिम टप्प्यात, स्पर्धेपूर्वी महाराष्ट्राविरुद्ध दोन सराव सामने; खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष

Goa Rain Shortage: पाऊस न पडल्यास भातशेती धोक्यात; कणसे धरू लागल्याने दिवसातून किमान एक हलकी सर आवश्यक, कृषी संचालकांचा इशारा

SCROLL FOR NEXT