Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: दाम्पत्याचा 100 हून अधिक जणांना 21 कोटींना गंडा; शेअर मार्केटमधून जादा परताव्याचे आमिष

‘ईओसी’कडून दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा

दैनिक गोमंतक

Goa Crime: शेअर मार्केटमध्ये थेट पैसे गुंतवणूक करून चांगल्या रक्कमेचा परतावा देण्याचे आमिष दाखवून शंभराहून अधिक गुंतवणूकदारांना सुमारे 20.83 कोटी रकमेचा गंडा घातल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे कक्षाच्या (ईओसी) पोलिसांनी सासष्टीतील मायरॉन रॉड्रिग्ज (53 वर्षे) व दीपाली परब (40 वर्षे) यांच्याविरुद्ध विश्‍वासघात व फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

त्यांनी स्वतःला स्टॉक ब्रोकर व गुंतवणूक असल्याचे भासवून गुंतवणूकदारांकडून पैसे घेतले होते. याप्रकरणी त्यांना लवकरच चौकशीसाठी समन्स बजावण्यात येणार असल्याची माहिती या कक्षाच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

संशयित मायरॉन रॉड्रिग्ज याने दक्षिण गोव्यातील भागात तो स्टॉक एक्स्चेंजमध्ये स्टॉक ब्रोकर व गुंतवणूक सल्लागार असल्याची तर संशयित दीपाली परब हिने स्वतः आर्थिक व्यवहारातील तज्ज्ञ असल्याची प्रतिमा तयार केली होती.

गोव्यातील अनेक गुंतवणूकदारांनी शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवले आहेत, त्याचा व्यवहार ते पाहत असल्याचे तसेच गुंतवणुकदारांची रक्कम थेट स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक केली जात असल्याचे सांगत होते.

या गुंतवणुकीतून चांगल्या रकमेचा परतावा दिला जात असल्याचे आमिष काही लोकांना दाखवले. शेअर मार्केटमध्ये पैसे कसे झपाट्याने जादा मिळतात, त्याचे सादरीकरणही दाखविले होते. यापूर्वी संशयितांविरुद्ध अशाच प्रकरणात पोलिसांत गुन्हा दाखल झालेला आहे.

संशयितांच्या या आमिषाला भुलून काही गुंतवणूकदारांनी झटपट पैसा मिळवण्याच्या उद्देशाने संशयितांकडे मोठ्या रकमा स्टॉक मार्केटमध्ये गुंतवण्यास दिल्या होत्या.

भेट टाळू लागल्याने वाढला संशय
गुंतवणूकदारांनी मोठ्या रकमा आरटीजीएस, एनईएफटी तसेच धनादेशाद्वारे संशयित मायरॉन रॉड्रिग्ज याच्या खात्यावर वर्ग केल्या होत्या. मात्र गुंतवणूक केलेली मूळ रक्कम व परताव्यासह परत करण्याची मागणी केली असता संशयित टाळाटाळ करू लागला.

त्याने गुंतवणूकदारांचे फोन तसेच भेटणेही टाळू लागला. त्यामुळे तो गुंतवणूकदारांची रक्कम परत न करता फसवणूक केल्याने काही गुंतवणूकदारांनी आर्थिक गुन्हे कक्षाकडे तक्रार दाखल केली होती.

संशयितांनी गुंतवणूकदारांच्या पैशांचा गैरवापर केल्याप्रकरणी संशयितांविरुद्ध भादंसंच्या कलम 406 व 420 खाली गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक पी. रामनाथकर करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT