Goa Narcotic Raid: म्हापशात 80 हजाराचा गांजा जप्त; पश्चिम बंगालमधील एकास अटक

म्हापशातील कदंबा स्टँडजवळ पोलिसांचा छापा
Goa Narcotic Raid
Goa Narcotic RaidDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Narcotic Raid: म्हापसातील कदंबा स्टँड परिसरात छापा टाकून पोलिसांनी अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या एकास रंगेहाथ पकडले आहे. म्हापसा पोलिसांनी ही कारवाई केली. म्हापशातील कदंबा बसस्थानकाच्या पाठिमागील बाजूस हा छापा टाकण्यात आला.

पोलिसांना विश्वसनीय सूत्रांकडून अमली पदार्थांच्या तस्करीबाबतची माहिती मिळाली होती. त्यामुळे पोलिसांच्या पथकाने येथे छापा टाकला.

Goa Narcotic Raid
Goa Forward Party च्या प्रयत्नांमुळेच मानवाधिकार आयोगाचे पुनर्गठन; दुर्गादास कामत यांचा दावा

या पथकातत पोलिस उपनिरीक्षक यशवंत मांद्रेकर, गौरव नाईक, हेड कॉन्स्टेबल सुशांत चोपडेकर, अक्षय पाटील, आनंद राठोड, राजेश कांदोळकर, प्रकाश पोळेकर, लक्ष्मिकांत नाईक यांचा समावेश होता.

या कारवाईत जार्जिस ताजेर महम्मद आलम (वय 22) याला अटक करण्यात आली आहे. तो सध्या आसगावात वास्तव्यास होता. तथापि, तो मूळचा बासुरिया, गंगारामपूर, दक्षिण दिनाजपूर, पश्चिम बंगाल येथील आहे.

त्याच्या 850 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. त्याची बाजारातील किंमत 80,000 रूपये इतकी आहे. हा गांजा तो एका ग्राहकाला देणार होता. तत्पुर्वीच पोलिसांनी त्याला अटक केली.

Goa Narcotic Raid
Goa Literacy Rate: गोवा 7 महिन्यात बनणार 100 टक्के साक्षर राज्य! 1500 निरक्षरांचे शिक्षण सुरू...

त्याच्यावर एनडीपीएस सह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे.

सध्या पोलिस त्याच्याकडे चौकशी करत आहेत. पोलिस उपनिरीक्षक गौरव नाईक पुढील तपास करत आहेत.

उत्तर गोव्याचे पोलिस अधीक्षक निधिन वाल्सन, म्हापसाचे एसडीपीओ जिवबा दळवी, पोलिस निरीक्षक शितकांत नायक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com