Goa Crime
Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: विद्यार्थी अपहरण प्रकरणी जन्मठेप; फिल्मी स्टाईलने पकडले होते आरोपींना

दैनिक गोमन्तक

Goa Crime: मालकावर असलेला राग काढण्यासाठी त्यांच्या विशेष क्षमतेच्या 11 वर्षीय मुलाचे अगदी फिल्मी स्टाईलने अपहरण करून त्याच्या उद्योजक वडिलांकडून खंडणी मागण्याच्या आरोपाखाली दोषी ठरल्यानंतर सत्र न्यायालयाने दोघा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्या शिक्षेवर काल सर्वोच्च न्यायालयानेही शिक्कमोर्तब केले.

रुपेश फाळकर आणि व्हिक्टर फर्नांडिस अशी आरोपींची नावे असून त्या दोघांनीही गेली 9 वर्षे आपण शिक्षा भोगत असल्याचे सांगत आपल्याला मुक्त करावे, अशी मागणी करणारा अर्ज सर्वोच्च न्यायालयात केला होता.

मात्र न्या. संजय कुमार कौल आणि न्या. अभय ओक यांनी हा अर्ज फेटाळून लावताना ज्याच्यावर त्या मुलाच्या पालकांचा केलेला विश्वासघात म्हणजे गंभीर स्वरूपाचा गुन्हा असून अशा गुन्ह्याला दया दाखविणे अशक्य आहे, असे स्पष्टपणे आपल्या निवाड्यात नमूद केले.

या दोन्ही अपहरणकर्त्यांचा फिल्मी स्टाईलने पाठलाग करून त्यांना अटक करून त्यांना शिक्षेपर्यंत पोहोचवण्यात मडगावचे तत्कालिन निरीक्षक आणि विद्यमान उपअधीक्षक संतोष देसाई यांनी सिंहांचा वाटा उचलला होता.

ही नाट्यमय अशी घटना 19 नोव्हेंबर 2011 रोजी मडगाव येथे घडली होती. मडगाव येथील एका प्रसिद्ध उद्योजकाकडे ड्रायव्हर म्हणून कामाला असलेल्या फाळकर याला आपल्या मालकावर राग होता.

त्याचा वचपा काढण्याच्या इराद्याने त्याने आपल्या अन्य एका साथीदाराच्या मदतीने त्या 11 वर्षीय विद्यार्थ्याचे शाळेतून अपहरण केले होते. आणि त्यानंतर त्याच्या वडिलांकडून खंडणी मागितली होती. एका व्हॅनमधून भर दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास हे अपहरण केले होते.

अटकेचा तीन तासांचा थरार !

अपहरणाची तक्रार मडगाव पोलिस स्थानकात नोंदवल्यावर तत्कालिन पोलिस निरीक्षक संतोष देसाई आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी फिल्मी स्टाईलने त्या गाडीचा सुसाट वेगाने पाठलाग केला होता. या आरोपींना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागला होता.

गोळ्यांच्या एकूण आठ फैरी झाडल्यानंतर पोलिसांनी आपली गाडी त्या अपहरणकर्त्यांच्या गाडीच्या आडवी घालून त्यांना जेरबंद केले होते.

सुमारे तीन तास हा पाठलागाचा थरार सुरू होता. नंतर हे प्रकरण न्यायालयात पोहोचल्यावर 25 साक्षीदार सादर करून आरोपींवरील गुन्हा सिद्ध झाल्याने दक्षिण गोवा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्या शिक्षेवर प्रथम उच्च न्यायालयाने आणि आता सर्वोच्च न्यायालयानेही शिक्कामोर्तब केले.

वडिलांना दिली होती धमकी

मुख्य आरोपी रुपेश फाळकर (रा. मोतीडोंगर) त्याने त्या विद्यार्थ्याचे फातोर्डा येथील शाळेतून अपहरण केले होते. त्या विद्यार्थ्याला न्यायला आलेल्या दुसऱ्या एका ड्रायव्हरला धक्का देऊन त्यांनी त्या विद्यार्थ्याला आपल्या गाडीत कोंबले आणि नंतर त्याच्या वडिलांकडे 20 लाखांची खंडणी मागितली होती.

‘या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यास तुमच्या मुलाचे बरे वाईट करू’ अशी धमकीही दिली होती. त्यामुळे त्याच्या घरच्यांनी सुरवातीला पोलिसांना कुठलीही कल्पना दिली नव्हती. त्याच्या वडिलांनी खंडणीची रक्कम देण्यासाठी बँकेतून पैसेही काढले.

ही रक्कम तुमच्या चालकामार्फत फोंड्याला पाठवून द्या अशी सूचना केली. पण नंतर एका त्रयस्थामार्फत ही माहिती पोलिस निरीक्षक संतोष देसाई यांना मिळाल्यावर त्यांनी त्या विद्यार्थ्याच्या वडिलांना विश्‍वासात घेऊन पोलिस करवाई सुरू केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mormugoa Port: खवळलेल्या समुद्रात बोटीचे इंधन संपले; मुरगावजवळ 24 पर्यटक आणि 2 क्रू सदस्यांना जीवदान

Goa Today's Live News: कोकण रेल्वेचे करमळी येथे लेक व्ह्यू रेस्टॉरंट; मडगावात रेंट बाईक सुविधा

Panaji Corporation : खोदकामांमुळे दोन महिन्‍यांपासून खावी लागतेय धूळ; रायबंदरवासीयांच्‍या नशिबी ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’

Goa HSC CBSE Result 2024: अनिश कांबळी राज्यात अव्वल; बारावी परिक्षेत मिळवले ९८.२० टक्के गुण

Smart City Road : सांतिनेजमधील अर्धा टप्पा अपूर्ण; खरे आव्‍हान पावसाचे आणि रस्‍ते खचण्‍याचे

SCROLL FOR NEXT