Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime : स्‍टेशनरी दुकानातून दीड लाखांचा गुटखा जप्‍त

म्हापसा येथील चंद्रनाथ अपार्टमेंटमधील एका दुकानावर छापा टाकत म्हापसा पोलिसांनी दीड लाखांचा गुटखा व सिगारेट जप्त केली.

दैनिक गोमन्तक

म्हापसा : येथील चंद्रनाथ अपार्टमेंटमधील एका दुकानावर छापा टाकत म्हापसा पोलिसांनी दीड लाखांचा गुटखा व सिगारेट जप्त केली.

‘नरेश पेन सेंटर’ या स्टेशनरी दुकानातून गुटखाची विक्री केली जात होती. याबाबतची माहिती मिळताच, पोलिसांनी ग्राहक बनून सदर दुकानाची शहनिशा करण्‍यात आली. दुकानमालक संशयित भूराराम चौधरी यास रंगेहात पकडले. झडतीवेळी दुकानात मोठ्या प्रमाणात साठवून ठेवलेला दीड लाखांचा गुटखा आणि सिगारेटचा माल पोलिसांच्या हाती लागला.

पोलिस निरीक्षक परेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक आशिष परब, विराज कोरगावकर, हवालदार सुशांत चोपडेकर, कॉन्‍स्‍टेबल राजेश कांदोळकर, आनंद राठोड व अक्षय पाटील या पथकाने ही कारवाई केली.

स्टेशनरी दुकानाच्या नावाखाली संशयित गुटखा व सिगारेटचा व्यवसाय करत होता आणि शहरातील व्यवसायिकांना तो माल पुरवत होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pramod Sawant: ‘शांतीप्रिय म्हणवणाऱ्या नेहरुंनी गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी 14 वर्षे विलंब केला’; CM प्रमोद सावंत

Blood Cancer: ब्लड कॅन्सर होण्यापूर्वी कोणती लक्षणे दिसतात? कोणत्या लोकांना जास्त धोका असतो? वेळीच सावध व्हा!

6600mAh बॅटरी, 108MP कॅमेरा आणि पॉवरफूल प्रोसेसरसह Honor X9c 5G लाँच! जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Pakistani Boat In Raigad: रायगडच्या समुद्रात 'पाकिस्तानी बोट'? काही लोक बोटीतून उतरल्याचा संशय, पोलिसांची धावपळ

Goa Politics: ...अन्यथा 2027 च्या निवडणुकीत गंभीर परिणाम भोगावे लागतील, गोमंतक गौड मराठा समाजाचा सरकारला इशारा

SCROLL FOR NEXT