Robbery in Mapusa Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: ग्रील्स तोडून दागिने लंपास; भंगार गोळा करणाऱ्या तब्बल पाच महिलांना अटक

Mapusa Robbery Case: हणजूण येथील घर फोडून सुवर्णालंकार जप्त करणाऱ्या एकूण पाच महिलांना गोवा पोलिसांनी अटक केली आहे

Akshata Chhatre

म्हापसा: सध्या गोव्यात चोरीच्या प्रकरणांना बराच ऊत आला आहे. हणजूण येथील घर फोडून सुवर्णालंकार जप्त करणाऱ्या एकूण पाच महिलांना गोवा पोलिसांनी अटक केली आहे. फिर्यादी डॉ. फेन्टन डिसोझा यांनी नोंदवलेल्या तक्रारीनुसार १९ ते २३ डिसेंबरच्या काळात हे चोरीचे प्रकरण घडले असून पाच संशयित आरोपींना पोलिसांनी त्वरित ताब्यात घेतले आहे.

फिर्यादी डॉ. फेन्टन डिसोझा यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार घर बंद असताना आरोपींनी खिडक्यांच्या ग्रिल्स तोडल्या आणि घरात प्रवेश केला. चोरांनी यावेळी अनेक सोन्याचे तसेच रत्नजडित ऐवज आणि काही इतर वस्तू मिळून लाखो रुपयांचा गंडा घातला.

घरात चोरी झाली असल्याचे २३ डिसेंबर रोजी फिर्यादीच्या लक्षात येताच त्यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली आणि पोलिसांनी २९ डिसेंबर रोजी पाच आरोपींना ताब्यात घेतलं. सध्या पोलिसांनी काही ऐवज हस्तगत केले असून पुढील तपास सुरु आहे.

आरोप केलेल्या संशयीतांमध्ये ललिता लमाणी, लक्ष्मी लमाणी, रेणूका पवार, पारू पुजारी व निलवा लमाणी यांचा समावेश आहे. या पाचही महिला गोव्याच्या नसून कर्नाटकच्या आहेत. त्या गोव्यात भंगार गोळा करण्याचं काम करतात आणि कुचेली करासवाडा येथे राहायला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: काब्रालचे भाजपला नथीतून बाण!

IND vs WI 3rd ODI: तिसऱ्या वनडेत मोठा बदल! रोहित शर्मा बाहेर, यशस्वी जयस्वालची एन्ट्री; पाहा टीम इंडियाची संभाव्य Playing-11

Goa FDA: तीन महिन्यांत 20.43 लाखांचा दंड; 'एफडीए'ची धडक कारवाई, 2,528 अन्न आस्थापनांची तपासणी

Goa Forward Panel: दामोदर कॉलेज विद्यार्थी मंडळ निवडणुकीत 'गोवा फॉरवर्ड'चा झेंडा; चारही प्रमुख जागा पॅनलच्या ताब्यात

VIDEO: देवीची मूर्ती आणताना काळाचा घाला! दुर्गोत्सवाच्या तयारीला गालबोट, भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू; 21 जखमी

SCROLL FOR NEXT