Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: भाडेकरुनेच केला मालकाचा आणि मित्राचा खून? दुहेरी हत्याकांडाने हादरले साळीगाव! पोलिसांकडून तपास सुरु

Double Murder in Saligao: साळीगाव येथील मुड्डावाडो परिसरातून एका धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका घरात दोन व्यक्तींचे मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

Manish Jadhav

Double Murder in Saligao: साळीगाव येथील मुड्डावाडो परिसरातून एका धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका घरात दोन व्यक्तींचे मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. प्राथमिक माहितीनुसार, या दोघांची हत्या त्यांच्याच भाडेकरुने केली असावी, असा पोलिसांना दाट संशय आहे. मात्र, भाडेकरुने कोणत्या कारणावरुन हे कृत्य केले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

मुड्डावाडो भागातील लक्ष्मी नारायण मंदिरामागे एका भाड्याच्या खोलीत या दोघांचे मृतदेह आढळून आले. रिचर्ड डी'मेल्लो आणि सोनू सिंग अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. ही दुहेरी हत्याकांडाची घटना आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने मुड्डावाडो येथील घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी पंचनामा सुरु केला असून या दुहेरी हत्येमागील नेमके कारण आणि आरोपी भाडेकरुचा शोध घेण्यासाठी कसून तपास सुरु आहे. भाडेकरु आणि मालक यांच्यातील वादातून हा प्रकार घडला असावा, असा पोलिसांचा (Police) प्राथमिक कयास आहे. पोलीस आरोपीला लवकरात लवकर पकडण्यासाठी स्थानिक आणि तांत्रिक पुरावे गोळा करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT