Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: म्हापसातील जाळपोळ प्रकरणात ट्विस्ट, पती-पत्नीच्या भांडणातून दुचाकी जाळल्याचं उघड; आरोपीला अटक

Mapusa Crime News: म्हापसा येथील एकता नगर येथे साईबाबांच्या मंदिराजवळ पार्क केलेल्या फसिनो स्कूटर आणि मोटारबाईक पूर्णपणे जळून गेल्या आहेत

Akshata Chhatre

म्हापसा: भल्या पहाटे म्हापसा शहरात एका अज्ञात व्यक्तीने दोन दुचाकींना आग लावली आणि यात दोन्ही दुचाकी जाळून खाक झाल्याने भरपूर नुकसान झाले आहे. म्हापसा येथील एकता नगर येथे साईबाबांच्या मंदिराजवळ पार्क केलेल्या फॅसिनो स्कूटर आणि एक मोटारबाईक पूर्णपणे जळून गेल्या आहेत तर बाजूला पार्क केलेल्या एक एक्टिवा गाडीचे देखील काही प्रमाणात नुकसान झाले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार कौटुंबिक वादातून ही घटना घडली असून पोलीस याचा पुढील तपास करतायत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपीचे नाव तमसिम शेख असून त्याला अटक करण्यात आलीये. शेख याच्या दोन पत्नी आहेत, पैकी दुसऱ्या पत्नीसोबत त्याचा घटस्फोट झाला असून याच वादाच्या कारणास्तव त्याने पूर्व पत्नीच्या फसिनो स्कूटरला आग लावली.

ही घटना शनिवारी (दि. २२) रोजी पहाटे सहाच्या सुमारास घडली असून आग विझवण्यापूर्वीच आग पसरली आणि बाजूला उभ्या असलेल्या इतर गाड्यांपर्यंत पोहोचली आणि त्यांचेही मोठे नुकसान झाले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी सध्या संशयित तमसिम शेख याला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरु आहे.

संशयित तमसिम शेख यांच्या दुसऱ्या पत्नीने दिलेल्या माहितीनुसार, त्या दोघांचा वैयक्तिक कारणांमुळे घटस्फोट झालाय आणि याच रागातून त्याने तिच्या गाडीला आग लावली. तामसिम तिला घटस्फोटानंतर देखील सोबत येऊन रहायला सांगत होता, ज्याला नकार दिल्याने रागाच्याभरात त्याने हे पाऊल उचललं आहे.

तमसिम शेख यांच्या पहिल्या पत्नीने देखील याला दुजोरा दिला असून तामसिम आणि त्याच्या दुसऱ्या पत्नीच्या घटस्फोटानंतर तो तिच्याजवळ सतत दागिन्यांची मागणी करायचा, ज्याला पत्नीने नकार दिला होता, याच रागातून त्याने गाडीला आग लावली आणि तशी कबुली देखील त्याने पोलिसांना दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT