Court |Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: ‘ते’ वाहन परत करण्यास न्यायालयाकडून नकार

दक्षिण गोव्यातील नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयातील एका विद्यार्थिनीवर ज्या वाहनात बलात्कार झाला, ते चारचाकी वाहन पोलिसांनी जप्त केले आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Crime: दक्षिण गोव्यातील नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयातील एका विद्यार्थिनीवर ज्या वाहनात बलात्कार झाला, ते चारचाकी वाहन पोलिसांनी जप्त केले आहे. हे वाहन परत करावे,यासाठी अटकेत असलेल्या वाहनाचा मालक संशयित चंद्रशेखर लमाणी याने केलेला अर्ज प्रथमश्रेणी न्यायालयाने फेटाळला.

या वाहनात बलात्कार झाल्याने ते या प्रकरणातील महत्वाचा पुरावा आहे, व तपासकाम प्राथमिक टप्प्यात असल्याचे निरीक्षण न्यायलयाने नोंदवले.

या बलात्काराच्या घटनेला 15 दिवसच उलटून गेले आहेत. ही घटना वाहनात झाल्याने ते जप्त करण्यात आले आहे.

काही पुरावे या वाहनातून जमा करण्यात आले आहेत. अजून फॉरेन्सिक लेबोरेटरीचा (एफएसएल) अहवाल आलेला नाही. जर या वाहनातून अधिक पुरावा शोधायचा असल्यास ते वाहन दिल्यावर तो नष्ट होईल. त्यामुळे हे वाहन तपासकामाचा भाग आहे.

त्यामुळे ते दिले जाऊ नये, अशी बाजू सरकारी वकील जे. रॉड्रिग्ज यांनी मांडली. बलात्कार प्रकरणी पोलिसांनी जप्त केलेले वाहन हे संशयिताचे एकमेव उदारनिर्वाहाचे साधन आहे. या वाहनाच्या धंद्यावरच त्याचे कुटुंब अवलंबून आहे.

पोलिसांनी घटनास्थळी पुरावे जमा केले आहेत त्यामुळे या वाहनाची पोलिसांना आवश्‍यकता नसावी. त्यामुळे हे वाहन संशयिताला परत करावे, असा युक्तिवाद धुमस्कर यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT