Social Media Offensive Post: राज्यात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याची घटना समोर आली आहे. पांडवांची पत्नी द्रौपदीबाबत ही आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आली. सरकारी कर्मचाऱ्याने ही पोस्ट केल्याचे सांगितले जात आहे. मंगळवारी (11 फेब्रुवारी) सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या या सरकारी कर्मचाऱ्याविरोधात बजरंग दलाचे भगवान रमेश रेडकर यांनी मडगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. मोहम्मद उर्फ बलबत्ती असे या आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्याचे नाव आहे. रेडकर यांनी आरोप केला की, मोहम्मद उर्फ बलबत्ती यांनी हिंदू देव-देवतांचा अपमान केला.
रेडकर यांच्या तक्रारीनुसार, मोहम्मद उर्फ बलबत्ती या सरकारी कर्मचाऱ्याने 7 फेब्रुवारी 2025 रोजी फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट केली होती. त्यांच्या या पोस्टमुळे हिंदू (Hindu) देव-देवतांचा अपमान झाला. मोहम्मद यांच्याविरोधात पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी अशी मागणी रेडकर यांनी केली. मोहम्मद यांनी जाणीवपूर्वक धार्मिक भावना आणि सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न केला असल्याचे देखील यावेळी रेडकर म्हणाले.
काही दिवसांपूर्वी, राज्यातील धार्मिक आणि सामाजिक सलोख्याचे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर सरकार कठोर कारवाई करेल, असा सज्जड दम मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिला होता. असे प्रयत्न मग ते कोणाकडूनही झाले तरी ते मुळीच खपवून घेतले जाणार नाहीत. येथे कोण चूक किंवा कोण बरोबर हा प्रश्न नाही, तर राज्याची शांतताप्रिय अशी ओळख बिघडवण्याचे हेतूतः प्रयत्न होत आहेत. या साऱ्यांवर सरकारची नजर आहे. कारवाई सुरु झाली की मग कोण कोणत्या विचारांचा आहे हेही पाहिले जाणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी ठणकावून सांगितले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.