crime in Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: कमिशन न मिळाल्याने गाडीला आग? शिरवईतील घटनेने खळबळ; पोलीस तपास सुरू

Car Burning Incident: घरात कोणीही नसताना एका अज्ञात व्यक्तीने कमिशन न मिळाल्याने ही आग लावली असल्याचा संशय जाफर यांनी व्यक्त केला आहे

Akshata Chhatre

शिरवाई: मध्यरात्री एक अज्ञात व्यक्तीने दक्षिण गोव्यातील शिरवई या भागातील जाफर नावाच्या एका स्थानिकांच्या ओम्नी मारुती गाडीला आग लावली. या घटनेमुळे जाफर यांचे जवळपास अठरा हजारांचे नुकसान झाले आहे. घरात कोणीही नसताना एका अज्ञात व्यक्तीने कमिशन न मिळाल्याने ही आग लावली असल्याचा संशय जाफर यांनी व्यक्त केला आहे.

काय आहे एकूण घटना?

शिरवई येथील पेडामोळ भागात राहणाऱ्या जाफर नावाच्या इसमाच्या ओम्नी मारुती गाडीला शुक्रवारी (दि.७) रोजी एका अज्ञात माणसाने आग लावली. या आगीमुळे गाडी संपूर्णपणे जळून खाक झाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, दक्षिण गोव्यातील शिरवई येथील जाफर नावाच्या या इसमाचा मसाल्याचा व्यवसाय आहे आणि या व्यवसायानिमीत्तच तो बाहेरगावी गेला होता.

त्याच्या अनुपस्थितीत एका अज्ञाताकडून घरभर असलेल्या गाडील आग लावण्यात आली. जाफरने दिलेल्या माहितीनुसार गाडी बाहेर बंद ठेवण्यात आली होती आणि संशयिताकडून मुद्दामून गाडी उघडून आग लावण्यात आलीये. घराचा दरवाजा देखील आगीने जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला.

कमिशन न नुकसान करावल्याचा संशय

जाफर यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार सध्या ते राहत असलेलं घर त्यांनी अलीकडेच विकत घेतलं आहे आणि यापूर्वी ते भाडेकरू म्हणून रहायचे. घर विकत घेतल्यानंतर त्यांना एका माणसाकडून सतत कमिशन मागण्यासाठी धमक्या दिल्या जायच्या आणि याच भावनेतून गाडीला देखील आग लावली असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. जाफर यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या भावोजींकडून रात्री आग विझवण्यात आली होती, तसेच त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार देखील नोंदवल्याने पोलीस पुढील तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan Comeback: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

SCROLL FOR NEXT