Goa Crime: तक्रारदाराने गोळी झाडण्यासाठी वापरलेले पिस्तुल ओळखले नाही; कळंगुट गोळीबार प्रकरणातील आरोपी दोषमुक्त

Calangute Gun Firing Case: कळंगुट येथे पिस्तुलच्या गोळ्या हवेत झाडून धमकी देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप असलेल्या साविओ याच्यासह तिघांना पणजी अतिरिक्त सत्र न्यायालयाने निर्दोष ठरवले.
Court Order
CourtDainik Gomantak
Published on
Updated on

Calangute Crime News

पणजी: कळंगुट येथे जमावाच्या दिशेने पिस्तुलच्या गोळ्या हवेत झाडून दहशत तसेच धमकी देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप असलेल्या साविओ वालिस याच्यासह तिघांना पणजी अतिरिक्त सत्र न्यायालयाने निर्दोष ठरवले. न्यायालयातील खटल्याच्या सुनावणीवेळी तक्रारदाराने गोळी झाडण्यासाठी वापरलेले पिस्तुल ओळखले नाही. त्यामुळे पुराव्याअभावी संशयितांना निर्दोष ठरवण्यात येत असल्याचे निरीक्षण केले आहे.

तक्रारदार देविदास रेडकर हा रात्री जेवण घेतल्यानंतर कळंगुट येथील भारत बार जंक्शनच्या ठिकाणी मित्रांना भेटायला गेला होता. तेथे पोचल्यावर एका विदेशी महिलेची दुचाकी उचलून नेण्याची कारवाई सुरू होती. त्याचेवेळी तिचा भाऊ रिकी तेथे आला. त्याने तेथे जमलेल्या जमवाशी हुज्जत घातली. त्यानंतर त्याचा भावोजी साविओ वालिस तेथे आला व त्याने खिशातील पिस्तुल काढून एक गोळी हवेत झाडली व दहशत माजवण्याचा प्रयत्न केला.

त्याला रोखण्यासाठी तक्रारदारासह जमाव त्याच्या दिशेने धावला, तेव्हा त्याने जमावावर पिस्तुल रोखून गोळी झाडली. मात्र, सुदैवाने कोणीही जखमी झाला नाही. जमाव त्याच्यावर चाल करून येत असल्याने संशयित साविओ तेथून पळ काढत आपल्या हॉटेलात गेला. या घटनेची तक्रार रेडकर याने दाखल केली होती.

Court Order
Usgao: संतापजनक! शेजारच्‍या चिमुकलीचा बळी घेऊन मृतदेह पुरला जमिनीत; संततीसाठी कसलये तिस्क येथे नरबळीचा संशय, दाम्‍पत्‍य ताब्‍यात

संशयितांना विसरला तक्रारदार!

१. कळंगुट पोलिसांनी सुकूर - पर्वरी येथील साविओ वालिसा, त्याची विदेशी पती लिसा मारिया डिअरमन व मेहुणा रिकी डिअरमन या तिघांविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.

२. न्यायालयाने या संशयिताविरुद्ध भादंसंच्या कलम ५०४, ३०७ व शस्त्रास्त्र कायद्याखाली आरोप निश्‍चित करण्यात आले होते.

३. पाच साक्षीदारांच्या साक्ष नोंदवण्यात आल्या. तक्रारदार देविदास रेडकर यांनी तक्रारीत त्यांच्यावर संशयित साविओ याने पिस्तुल रोखल्याचे तक्रारी नमूद केले होते.

४. मात्र, न्यायालयात साक्ष देताना संशयितांना ओळखत नाही व त्यांच्याकडे असलेले पिस्तुल कोणते होते हे माहीत नाही. हे विधान कोणत्याही दडपणाशिवाय केले आहे.

५. संशयितांनी त्याच्याविरोधात शिविगाळ करणारी भाषा वापरली असताना प्रत्यक्षात ते शब्द त्याला मला नाहीत असे साक्षीत सांगितले. इतर साक्षीदारांनीही संशयिताला तसेच घटनेवेळी वापरलेले पिस्तुल ओखळत नसल्याचे सांगितले.

Court Order
Goa Crime: कचरा वेचणाऱ्या महिलेवर लैंगिक अत्याचार, जीवे मारण्याची दिली धमकी; कर्नाटकच्या तरुणाला अटक

एकही आरोप सिद्ध झाला नाही

साक्षीदारांच्या जबानीवरून संशयितांविरुद्धचे पुरावे सिद्ध होत नाहीत. संशयित साविओ याने दहशत माजवण्याचा प्रयत्न केल्याचा, तक्रारदाराच्या दिशेने त्याने गोळी झाडल्याचे तसेच गोळी ज्या पिस्तुलमधून झाडण्यात आली त्याचा परवाना नव्हता हे तिन्ही मुद्दे सिद्ध झाले नाहीत, असे न्यायालयाने निरीक्षण केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com