labourer killed Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Murder: डोकं, मान आणि गुप्तांगावर गंभीर वार; गोव्यात ओडिशातील मजुराची निर्घृण हत्या!

Parra Murder Case: ही घटना रात्री १० ते ११ च्या सुमारास घडली असून, आरोपींनी क्रूरतेची परिसीमा गाठल्याचे दिसून येते.

Akshata Chhatre

पर्रा: मंगळवारी (दि.७) रात्री उशिरा पर्रा येथील एका बांधकाम साईटवर मजुराची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना रात्री १० ते ११ च्या सुमारास घडली असून, आरोपींनी क्रूरतेची परिसीमा गाठल्याचे दिसून येते.

नेमकी काय घडली घटना?

मिळालेल्या माहितीनुसार, बांधकाम साईटशेजारील एका लहान खोलीत तीन मजूर एकत्र राहत होते. मंगळवारी रात्री याच खोलीत दोघांनी तिसऱ्या मजुरावर तीक्ष्ण हत्याराने हल्ला केला. या हल्ल्यात मृत मजुराच्या डोक्यावर, मानेवर आणि पोटावर गंभीर वार करण्यात आले. एवढेच नाही, तर आरोपींनी त्याच्या गुप्तांगाचीही विटंबना केली असल्याचे समोर आले आहे. या भीषण घटनेनंतर दोन्ही आरोपी घटनास्थळावरून फरार झालेत आणि पोलीस तपास सुरु झाला आहे.

पोलिसांकडून खुनाच्या गुन्ह्याचा तपास सुरू

या घटनेची माहिती मिळताच, म्हापसा पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलीस निरीक्षक निखिल पालेकर, पोलिस उपअधीक्षक विल्सन डिसोझा आणि उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी स्वतः घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून, फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला आहे.

या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा गांभीर्याने तपास सुरू केला असून या हत्येमागील नेमके कारण काय होते, याचा पोलीस शोध घेत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Water Taxi: ट्राफिक जॅमची समस्या विसरा… गोव्यात 4 जलमार्गांवर सुरु होणार वॉटर टॅक्सी सेवा; थेट पाण्यातून करता येणार प्रवास

Rajinikanth's Guru: हिमालयात गूढ गुहेत राहणारे, महादेवाचे अवतार मानले जाणारे 'रजनीकांत' यांचे अध्यात्मिक गुरु कोण आहेत?

Zuari Bridge Car Accident: झुआरी पुलावर बीएमडब्ल्यू कारचा अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली

भिवपाची गरज आसा! गोव्यात कामगारांची पिळवणूक; विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचारी आझाद मैदानावर एकवटले

Hydroponic Farming: हायड्रोपोनिक्स! मातीविरहित शेती शिका, घरच्याघरी भाज्या मिळवा..

SCROLL FOR NEXT