Goa Crime: सुट्टी असतानाही गणवेशात घरातून निघाल्या; दोन शाळकरी मैत्रिणी बेपत्ता, कुंकळ्ळी पोलिसांकडून अपहरणाचा गुन्हा दाखल

Missing Girls Case Goa: कुंकळ्ळी पोलिसांनी या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून, मुलींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना केली आहेत
kidnapping Goa
kidnapping GoaDainik Gomantak
Published on
Updated on

School Girls Missing Goa: कुंकळ्ळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन १५ वर्षीय शाळकरी मुली बेपत्ता झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या दोन्ही मैत्रिणी दहावीत शिकणाऱ्या असून, शुक्रवारी सकाळी सुमारे ७:३० वाजता शाळेच्या गणवेशात घरातून निघाल्या होत्या. मात्र, तो दिवस शाळेला सुट्टी असल्याचे कुटुंबीयांना कळताच, त्यांनी तातडीने मुली बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच दिवशी पोलिसांत दाखल केली. कुंकळ्ळी पोलिसांनी या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून, मुलींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना केली आहेत.

गुढरित्या बेपत्ता, गोवा राज्याबाहेर गेल्याची शक्यता

प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, बेपत्ता झालेल्या दोघी मैत्रिणी गुरुवारी एकमेकींच्या संपर्कात होत्या. शुक्रवारी सकाळी घरातून निघाल्यानंतर त्या दोघी मडगावला गेल्या आणि तिथून रेल्वे स्थानकाकडे रवाना झाल्याचे समजते. मुलींपैकी एका मुलीकडे मोबाईल फोन होता.

kidnapping Goa
Goa Crime: अनैतिक संबंधातून पतीचा खुन! संशयितेला व्‍हिडिओ कॉन्‍फरन्‍सिंगमध्‍ये आणण्यात अपयश; कोलवाळ तुरुंग अधीक्षकाला नोटीस

सायंकाळी ७:३० च्या सुमारास तिने पालकांच्या फोन कॉलला प्रतिसाद दिला, परंतु त्यानंतर लगेचच तिने फोन बंद केला. धक्कादायक बाब म्हणजे, या फोनचे शेवटचे लोकेशन कणकवली येथे ट्रेस झाले आहे, ज्यामुळे त्या दोघी गोवा राज्याबाहेर गेल्या असण्याची शक्यता बळावली आहे.

पोलिसांकडून युद्धपातळीवर शोधमोहीम

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत, कुंकळ्ळी पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंदवला आहे. पोलिस उपनिरीक्षक किशोर वेळीप यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तात्काळ कणकवलीकडे रवाना झाले आहे. बेपत्ता मुलींचे वर्णन असलेली विस्तृत वायरलेस अलर्ट गोवा आणि शेजारील राज्यांमध्येही पाठवण्यात आले आहेत, जेणेकरून त्यांच्या शोधात मदत मिळू शकेल.

या प्रकरणातील गूढता आणि मुलींचे अल्पवयीन वय पाहता, पोलीस यंत्रणा अतिशय सतर्कतेने तपास करत असून, दोन्ही मुली सुरक्षितपणे घरी परताव्यात यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com