Assagao House Demolition Dainik Gomantak
गोवा

Assagao Demolition: आसगाव घर मोडतोड प्रकरण! पूजा शर्माला क्राईम ब्रँचच्या एसआयटीचा समन्स

Assagao House Demolition Case: परदेशात असणाऱ्या ओमवीर सिंग बिष्णोई यांनी तात्काळ कर्तव्यावर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Pramod Yadav

आसगाव येथील आगरवाडेकर कुटुंबीयांचे घर मोडतोड प्रकरणातील मुख्य संशयित पूजा शर्माला समन्स बजावण्यात आला आहे. क्राईम ब्रँचच्या 'एसआयटी' ने एक जुलै रोजी चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे, अशी माहिती क्राईम ब्रँचचे अधीक्षक राहुल गुप्ता यांनी दिली.

दुसरीकडे प्रकरणामुळे अडचणीत सापडलेले पोलिस महासंचालक जसपाल सिंग यांची बदली होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

पोलिस महासंचालक जसपाल सिंग यांच्या बदलीबाबत राज्य सरकारकडून हालचालींना वेग आला असून, याबाबतचा अहवाल केंद्राला पाठविण्यात आला आहे. महासंचालक पदाचा अतिरिक्त भार राज्याचे तुरुंग पोलिस महानिरीक्षक ओमवीर सिंग बिष्णोई यांच्याकडे दिला जाण्याची शक्यता आहे.

यासाठी परदेशात असणाऱ्या ओमवीर सिंग बिष्णोई यांनी तात्काळ कर्तव्यावर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

परेश नाईक यांच्याकडे हणजूण पोलिस स्थानकाचा ताबा

आसगाव येथील आगरवाडेकर कुटुंबीयांचे घर मोडतोडप्रकरणी हणजूण पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक प्रशल नाईक देसाई यांचे निलंबन करण्यात आले आहे.

आता त्यांच्या जागी कळंगुटचे पोलिस निरीक्षक परेश नाईक यांच्याकडे हणजूण पोलिस स्थानकाचा ताबा देण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cuncolim: सफर गोव्याची! गोवा मुक्ती लढ्याची‌ ठिणगी पडलेले, 12 बांधाच्या पाण्याने समृद्ध असलेले 'कुंकळ्ळी'

T20 World Cup 2026: बीसीसीआयचा 'स्ट्रिक्ट' मोड! मिशन वर्ल्ड कपसाठी 'होम मिनिस्टर'ची साथ सुटली; नियमावर बोट ठेवत खेळाडूंना ठणकावलं

Grah Gochar 2026: 120 वर्षांनंतर घडणार मोठा चमत्कार! शुक्र-सूर्य-शनीच्या त्रिनेत्र युतीनं 'या' 5 राशींवर होणार पैशांचा पाऊस

Bison In Goa: ब्रह्मकरमळीत गवा रेड्यांचा धुमाकूळ; दगडी कुंपण तोडून कळपाचा शिरकाव; शेतकरी चिंतेत

Salman Khan: "सलमान आणि मी एकत्र नग्न होऊन आंघोळ केलीय पण...", भाईजानच्या खास फ्रेंडने केला धक्कादायक खुलासा

SCROLL FOR NEXT