गेल्या चार ते पाच दिवसांपासून गोवा राज्यातील वातावरण धान्य तस्करी प्रकरणाने ढवळून निघाले आहे. या प्रकरणातील मुख्यसंशयित सचिन नाईक बोरकर याने अटकपूर्व जामीन अर्ज केला आहे. या जामीन देण्याला क्राईम ब्रँचने विरोध केला आहे. यावेळी दुसऱ्या बाजुला क्राईम ब्रँच राजकीय दबावापोटी मला अडकवण्याच्या प्रयत्नात असल्याचे संशयिताने युक्तीवाद म्हटले आहे.
(goa Crime Branch has opposed the anticipatory bail plea of alleged mastermind in civil supplies department)
क्राईम ब्रँचने अटकपूर्व जामीनाला विरोध करताना म्हटले आहे की, संशयित आरोपी सचिन नाईक हा गुन्हेगार असून त्याच्यावर फसवणूक, गुन्हेगारी कट, पुरावे नष्ट करणे आणि खोटे वजन वापरून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. त्याचबरोबर फोंडा पोलिसांनी 2012 मध्ये जीवनावश्यक वस्तू कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांखाली त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
क्राईम ब्रँचने म्हटले की, शासकीय गोदामातून धान्य उचलले जात असल्याने, वेगवेगळ्या व्यक्तींनी एकत्र येत तयार केलेला हा कट आहे. याचा पर्दाफाश करण्यासाठी आणि धान्याच्या विक्रीतून मिळालेली रक्कम शोधण्यासाठी सचिन नाईकची चौकशी होणे आवश्यक आहे. यासाठी जामीन देण्याला क्राईम ब्रँचने विरोध केला आहे.
दुसरीकडे, सचिन नाईक बोरकर यांनी त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जात असा युक्तिवाद केला आहे की, राजकीय दबावापोटी क्राईम ब्रँचने आपल्याला या प्रकरणात अडकवण्यासाठीची ही योजना आखली गेली होती. तसेच या प्रकरणात आपल्याला अडकवण्याचा राजकीय डाव आहे. त्यामुळे मला या प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळावा असा युक्ती वाद केला आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.