Bangladeshi dacoit gang Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: लुटमार, मारहाण अन् दहशत! वृद्धांना कोंडून सोनं लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, पाच बांगलादेशी जेरबंद; गोवा पोलिसांना मोठं यश

Bangladeshi dacoit gang Goa: दोना पावला आणि म्हापसा येथे झालेल्या धाडसी दरोड्यांनी राज्य हादरवून सोडणाऱ्या बांगलादेशी टोळीच्या पाच संशयितांना गोवा गुन्हे शाखेने अखेर दिल्लीहून गोव्यात आणले आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: दोना पावला आणि म्हापसा येथे झालेल्या धाडसी दरोड्यांनी राज्य हादरवून सोडणाऱ्या बांगलादेशी टोळीच्या पाच संशयितांना गोवा गुन्हे शाखेने अखेर दिल्लीहून गोव्यात आणले आहे. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केलेल्या या दरोडेखोरांचा ताबा घेण्यासाठी गेलेले गोवा पोलिसांचे पथक त्यांना घेऊन राज्यात दाखल झाले असून, सध्या न्यायदंडाधिकाऱ्यांनी सर्वांना ११ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

२०२५ मध्ये या टोळीने गोव्यात दोन मोठे दरोडे टाकले होते. २० एप्रिल २०२५ रोजी याच दरोडेखोरांनी दोना पावला येथील बंगल्यात वृद्धांना कोंडून १ किलो सोने आणि ३ लाखांची रोकड लंपास केली होती. तसेच ७ ऑक्टोबर २०२५ रोजी म्हापसा येथील गणेशपुरी हाउसिंग बोर्ड परिसरात एका कुटुंबाला मारहाण करून ३५ लाखांचा ऐवज लुटला होता.

या गुन्ह्यांच्या तपासासाठी जानेवारी २०२६ मध्ये हे प्रकरण गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आले होते. १४ एप्रिल २०२६ रोजी दिल्लीतील सराई काळे खान परिसरात झालेल्या चकमकीनंतर दिल्ली पोलिसांनी या टोळीला बेड्या ठोकल्या होत्या. पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली तीन पोलिस निरीक्षक आणि २० हवालदारांचे विशेष पथक गेल्या आठवड्यात दिल्लीला रवाना झाले होते. कायदेशीर प्रक्रिया आणि ट्रान्झिट वॉरंट पूर्ण केल्यानंतर, या टोळीतील पाच प्रमुख आरोपींना गोव्यात आणण्यात आले आहे.

या टोळीने केवळ गोव्यातच (Goa) नव्हे, तर कर्नाटक, ओडिशा आणि उत्तर प्रदेश या राज्यांतही गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आता पोलिस कोठडीत असलेल्या या संशयितांकडून म्हापसा आणि दोना पावला लुटीतील मुद्देमाल हस्तगत करणे व फरार असलेले शाकायत व इलियास यांना शोधण्याचे पोलिसांपुढे मोठे आव्हान असणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa POCSO Case: इन्स्टाग्रामवरची मैत्री बेतली अंगलट; अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला!

Team India: गौतम गंभीरला 'इग्नोर' करत आहेत सीनियर खेळाडू? ड्रेसिंग रूममध्ये धुसफूस, 'BCCI'पर्यंत पोहोचली नाराजी

Tata Group Crisis: टाटांच्या 'ट्रस्ट'वरच अविश्वासाचे सावट? ऐतिहासिक वारसा असलेल्या समूहात सत्तेवरून वादाची ठिणगी!

Goa Education: गोव्याचा स्थानिक वारसा आता अभ्यासक्रमात, NEP-अनुरूप पाठ्यपुस्तकांची सर्व वर्गांत अंमलबजावणी

Chimbel Borewell Case: चिंबलमधील बेकायदेशीर 27 बोअरवेल सील, 'जलस्त्रोत'कडून कारवाई

SCROLL FOR NEXT