पणजी: गोव्यातून कर्नाटकातील बेळगावकडे बनावट व भेसळयुक्त दारूची वाहतूक केल्याच्या आरोपावरून पोलिसांच्या गुन्हे शाखेने दुसरा संशयितशैलेश जयवंत जाधव (रा. इस्लामपूर, सांगली, महाराष्ट्र) याला अटक केली आहे. या प्रकरणात यापूर्वी एकाला अटक करण्यात आली होती.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ डिसेंबर २०२५ रोजी रात्री ८.३३ वाजता एमएच-१०-सीआर-१८३९ क्रमांकाच्या ट्रकमधून गोव्यातून (Goa) बेळगावच्या अज्ञात ठिकाणी बनावट व भेसळयुक्त दारूची वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती मिळाली. ती दारू मानवी सेवनासाठी वापरली जाणार असल्याने संसर्गजन्य आजार पसरण्याचा तसेच मानवी जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता होती.
संबंधित अधिकाऱ्यांची परवानगी न घेता व शासनाला आवश्यक शुल्क न भरता ही वाहतूक करण्यात आल्याने सरकारी महसुलाची फसवणूकही झाल्याचे तपासात उघड झाले. या प्रकरणी हुसेन साब मुल्ला (रा. बिजापूर, कर्नाटक) याला ६ डिसेंबर २०२५ रोजी अटक करण्यात आली होती. कारवाईदरम्यान एकूण १,४९८ दारूच्या पेट्या, प्रत्येकी २५ किलो वजनाच्या एशियन पेंट्स ‘मार्व्हेलोप्लास्ट’च्या ३५ पिशव्या तसेच संबंधित ट्रक असा सुमारे १ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तपासादरम्यान सदर गुन्हा हा शैलेश जयवंत जाधव (रा. इस्लामपूर, सांगली, महाराष्ट्र) याच्या सूचनेनुसार केल्याचे निष्पन्न झाले. शैलेश जाधव यानेच ट्रक, माल आणि बनावट बील उपलब्ध करून दिल्याचे तपासात समोर आले आहे. गुन्ह्यानंतर तो फरार झाला होता. मात्र, गुन्हे शाखेच्या पथकाने इस्लामपूर (सांगली) येथून त्याला अटक करून गोव्यात आणले. २६ जानेवारी २०२६ रोजी त्याला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.