Goa To Mumbai Liquor Smuggling: गोव्यातून मुंबईत विदेशी मद्याची तस्करी, 64 लाखांची अवैध दारु जप्त

Illegal Alcohol Smuggling: ठाण्यात आणलेले हे मद्य मुंबई आणि आसपासच्या भागात विकण्याची योजना होती.
Goa to Mumbai foreign liquor smuggling busted
Liquor smugglingDainik Gomantak
Published on
Updated on

ठाणे: महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाने ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा परिसरात मोठी कारवाई केली आहे. विभागाने केलेल्या छापेमारीत गोव्यातील परदेशी मद्याचे ८०० बॉक्स जप्त करण्यात आले आहेत. १६ मे २०२५ रोजी मुंब्रा रोडवरील अमित गार्डनजवळ ही कारवाई करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या मद्याची किंमत ६४ लाख रुपये असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी चालकाला अटक करण्यात आली आहे.

जुल्फिकार ताजली चौधरी असे अटक करण्यात आलेल्या चालकाचे नाव आहे. टेम्पोतून मद्य तस्करी होत असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली, माहितीच्या आधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी (MH 05 AM 1265) या वाहनाची झडती घेतली असता त्यात बेकायदेशीर मद्यसाठा आढळून आला. अधिकाऱ्यांनी वाहनातून मद्य जप्त करत चालकाला अटक केली आहे. ठाण्यात आणलेले हे मद्य मुंबई आणि आसपासच्या भागात विकण्याची योजना होती.

Goa to Mumbai foreign liquor smuggling busted
Bicholim River: मान्सूनपूर्वी डिचोली नदी होणार चकाचक! पूरप्रतिबंधात्मक उपाययोजना; गाळ उपसण्याचे काम सुरु

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सहाय्यक आयुक्त प्रसाद सुर्वे, कोकण विभागीय उपायुक्त प्रदीप पवार, अधीक्षक प्रवीण तांबे, उपअधीक्षक वैद्य, पोकळे आणि ए.डी. यांनी केली. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. त्या टीममध्ये इन्स्पेक्टर एम.पी. यांचाही समावेश होता.

मुंब्रा येथील या मद्य तस्करी प्रकरणाचा पुढील तपास पोलिस अधीक्षक प्रवीण तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक महेश प्रकाश धनशेट्टी करत आहेत. मुंबईतील या दारू तस्करी रॅकेटमध्ये आणखी लोकांचा सहभाग असण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com