Arrested Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: गोमंतकीयांची तब्बल 'एवढ्या' कोटींची फसवणूक करणारे गजाआड; गोवा पोलिसांनी आवळल्या मुसक्या!

Goa Crime: गोमंतकीयांना तब्बल 5.7 कोटींचा गंडा घालून गेल्या एका वर्षापासून फरार असणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.

Manish Jadhav

गोमंतकीयांना तब्बल 5.7 कोटींचा गंडा घालून गेल्या एका वर्षापासून फरार असणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. सोन्याच्या व्यापारातून फायदेशीर परतावा आणि कमी दरात सोने देण्याचे आश्वासन पकडण्यात आलेल्या आरोपींनी दिले होते. गोवा पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही मोठी कारवाई केली. गेल्या वर्षापासून हे दोघेही आरोपी फरार होते. मात्र आता त्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांच्या गुन्हे शाखेला यश आले आहे. एप्रिल 2023 पासून पोलिस त्या दोघांच्या शोधात होते. हे दोघेही आरोपी मुंबईचे रहिवाशी आहेत.

दरम्यान, गोमंतकीयांची फसवणूक केलेल्या आरोपींची नावे अनुक्रमे अक्षय सावंत आणि पल्लवी घाडगे अशी आहेत. त्यांनी सोन्याच्या व्यापारातून चांगला परतावा देण्याचे आश्वासन देऊन गोमंतकीयांची फसवणूक केली. त्यांनी गोव्यातील सर्वसामान्य जनतेला आपल्या जाळ्यात अडकवले. कमी दरात सोने उपलब्ध करुन देऊ असे आरोपींनी त्यांना सांगितले होते. मात्र अखेर गोवा पोलिसांच्या गुन्हे शाखेला या गंडा घातलेल्या आरोपींना अटक करण्यात यश आले. आपली फसवणूक झाल्याचे सांगत पर्वरीतील 4 गोमंतकीयाकडून तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीच्या आधारेच पोलिसांनी तपास सुरु केला होता.

पोलिस निरिक्षक सुरज हळणकर यांच्या नेतृत्वाखाली उपनिरिक्षक विकार देकर, सतीश नाईक, सुशांत पागी, संदेश कांबळी आणि सामी मकानदार यांच्या पथकाने ही कारवाई केली. दरम्यान, आरोपी अक्षय सांवत आणि पल्लवी घाडगे यांच्याकडून पोलिसांच्या गुन्हे शाखेने यावेळी विविध बँकांची 20 पासबुक, 13 वेगवेगळ्या बँकांची चेकबुक, एक लॅपटॉप, एक पेनड्राईव्ह, वेगवेगळ्या बँकांचे आठ एटीएम कार्ड, 11 सिमकार्ड जप्त केले. याशिवाय, 17 लाखांची ठेव असणारी बँक खाती गोठवण्यात आली.

दाबोळीवर 22 तर मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर 13 किलो सोन्‍याची तस्‍करी

मागील 15 महिन्‍यांत दाबोळी तसेच मोपा आंतरराष्‍ट्रीय विमानतळांवर तब्‍बल 35.41 किलो सोन्‍याची तस्‍करी झाल्‍याचे उघड झाले आहे. ‍13.08 किलो सोने मोपा येथे, तर 22.33 किलो सोन्‍याची तस्‍करी दाबोळी विमानतळावर झाली आहे.

तिघा कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल

दक्षिण गोव्‍याचे खासदार कॅ. विरियातो फर्नांडिस यांनी लोकसभेत विचारलेल्‍या एका प्रश्‍नाला केंद्रीय वित्त खात्‍याचे राज्‍यमंत्री पंकज चौधरी यांनी लेखी स्‍वरुपात हे उत्तर दिले. एका तस्‍करी प्रकरणात दाबोळी विमानतळावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचाच हात असल्‍याचे उघड झाल्‍यावर तिघांवर गुन्‍हा नोंद झाल्‍याचे या उत्तरात म्‍हटले होते. 19 जानेवारी रोजी दाबोळी विमानतळावर गोल्‍ड पेस्‍टच्‍या स्‍वरुपात 5,293 ग्रॅम सोने आणले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोवा आणि सिंधुदुर्ग संबंध अधिक दृढ होणार, तवडकरांनी घेतली नारायण राणेंची भेट; विकासावर केली चर्चा!

"घे रे पातोळ्यो खाया सगळेजाण" मुख्यमंत्र्यांना 'खाऊचा डब्बा' देणाऱ्या चिमुकलीचा Video Viral

IND vs ENG: विकेट मिळाली, पण एक चूक झाली! प्रसिद्ध कृष्णाचा विकेटचा आनंद क्षणातच मावळला; काय झालं नेमकं? पाहा व्हिडिओ

Goa Politics: विरोधकांचे मुद्दे खोडता येतनसल्याने सत्ताधाऱ्यांचा धुडगूस; कार्लुस फेरेरा

Lucky Zodiac Signs: 4 ऑगस्टचा सोमवार खास! 5 भाग्यवान राशींचे नशिब उजळणार; होणार लक्ष्मीचा कृपावर्षाव

SCROLL FOR NEXT