Aldona Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: 10 वर्षांच्या लकीने रचला डाव; वर्गमित्र आणि त्याच्या आजोबांना काठीने मारहाण

Child Crime Goa: शाळेतून सुटल्यावर घरी परतणाऱ्या १० वर्षांच्या सॅम्युअल मार्टिन्स आणि त्याचे आजोबा जॉन सिरिल फर्नांडिस यांच्यावर लाकडी काठ्यांनी प्राणघातक हल्ला

Akshata Chhatre

School Ragging Case Goa

म्हापसा: हळदोण येथील सेंट थॉमस बॉईज शाळेबाहेर १० मार्च २०२५ रोजी एका धक्कादायक हिंसाचाराची घटना घडली. शाळेतून सुटल्यावर घरी परतणाऱ्या १० वर्षांच्या सॅम्युअल मार्टिन्स आणि त्याचे आजोबा जॉन सिरिल फर्नांडिस यांच्यावर लाकडी काठ्यांनी प्राणघातक हल्ला करण्यात आला. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

तक्रारी करूनही छळ सुरूच...

मुलाची आई, बेंडिटा मार्टिन्स यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या मुलाचा लकी नावाच्या वर्गमित्राकडून वारंवार छळ केला जात होता. शाळेच्या अधिकाऱ्यांकडे अनेक तक्रारी करूनही त्यांच्याकडून काहीही निर्णय घेतला गेला नाही आणि हा छळ मात्र सुरूच होता.

घटनेच्या दिवशी, लकीने एका अज्ञात पुरुषासह सॅम्युअलला अडवले आणि त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सॅम्युअल घाबरून आपल्या आजोबांकडे धावला, जे त्याला शाळेतून घरी घेऊन जायला आले होते. यावेळी, अजित जलमी नावाच्या व्यक्तीने आजोबांना मारहाण केली. त्यानंतर, लाकडी काठीने ज्येष्ठ नागरिक आणि सॅम्युअल दोघांवरही हल्ला केला. विशेष म्हणजे, लकीनेच हल्ल्यासाठी लाकडी काठ्या पुरवल्याचा आरोप आहे.

पूर्वनियोजित हल्ला असल्याचा संशय

या हल्यात पीडितांना गंभीर दुखापत झाली असून, वैद्यकीय तपासणीनंतर पीडित कुटुंबाने म्हापसा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या हल्ल्यात पुरवण्यात आलेल्या लाठ्यांमुळे हा हल्ला पूर्वनियोजित असल्याचा संशय बळावला आहे. वारंवार तक्रारी करूनही शाळेने कारवाई न केल्याने पीडित मुलाच्या पालकांनी संताप व्यक्त केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण समुदायात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. म्हापसा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Danish Chikna Arrested: 'चिकना'चा खेळ संपला! अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या खास माणसाला गोव्यातून उचललं, पत्नीलाही ताब्यात घेतलं

Horoscope: मेहनतीला योग्य फळ मिळेल, भावनिक स्थैर्य राखा; आर्थिक स्थिती मजबूत

Anjuna Cocaine Case: हणजूण कोकेन तस्करी प्रकरणी कॅमेरोनियन नागरिकाला 6 दिवसांची पोलीस कोठडी!

Edberg Pereira Assault Video: पोलिसांनी लाथा घातल्या, मारहाण केली; परेरा मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज आले समोर, पाहा व्हिडिओ

Edberg Pereira Assault Case: एडबर्ग परेरा मारहाण प्रकरणी निलंबित PSI निलेश वळवईकरांवर गुन्हा दाखल; पुढील तपास सुरु

SCROLL FOR NEXT