Pilgao Panchayat stay order Bagwada
Pilgao Panchayat stay order BagwadaDainik Gomantak

बागवाडातील भूखंड विकासकामाला स्थगिती, पिळगाव पंचायतीकडून नोटीस; विरोधात 'एसटी' बांधव एकवटले

Pilgao Panchayat stay order Bagwada: ‘एसटी’ बांधवांच्या विरोधामुळे पिळगाव पंचायत क्षेत्रातील बागवाडा येथील भूखंड विकासकामाला स्थानिक पंचायतीने तात्पुरती स्थगिती दिली आहे.
Published on

डिचोली: ‘एसटी’ बांधवांच्या विरोधामुळे पिळगाव पंचायत क्षेत्रातील बागवाडा येथील भूखंड विकासकामाला स्थानिक पंचायतीने तात्पुरती स्थगिती दिली आहे. यासंदर्भात, पंचायतीने नोटीसही जारी केली आहे.

बागवाडा येथील लोकवस्तीपासून काही अंतरावरील निर्जनस्थळी गावाबाहेरील एका बिल्डर कंपनीकडून बुलडोझरच्या साहाय्याने जमीन सपाटीकरणाचे काम सुरू होते. मात्र, स्थानिक पंचसदस्य मोहिनी जल्मी यांनी केलेल्या तक्रारीवरून पंचायतीने कारवाई केली.

Pilgao Panchayat stay order Bagwada
Goa Politics: 'आप’च्‍या 'ऑफर'वर अद्याप आपण विचारच केलेला नाही! नावेलीतून वालंका निवडणूक लढविणारच - चर्चिल आलेमाव

सध्या हे काम बंद असले तरी ते पुन्हा सुरू करण्यासाठी संबंधितांकडून प्रयत्न सुरू असल्याचा स्थानिकांचा दावा आहे. तसे झाल्यास आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशारा ‘एसटी’ बांधवांनी दिला आहे.

Pilgao Panchayat stay order Bagwada
Goa Bomb Threat: मोठी बातमी! पणजीतील पासपोर्ट भवन बॉम्बने उडवून देण्याची धमकी; प्रशासनाची धावपळ अन् परिसरात भीतीचे वातावरण

‘तो’ भाग ‘इको-सेन्सिटिव्ह

ज्या परिसरात भूखंड विकसित करण्याचे काम सुरू आहे, तो भाग ‘इको-सेन्सिटिव्ह झोन’मध्ये येतो, असा दावा करण्यात आला. भूखंड विकास झाल्यास नैसर्गिक संपत्तीवर परिणाम होऊन भविष्यात गावाच्या अस्तित्वालाच धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती मोहिनी जल्मी आणि माजी पंचसदस्य शिवाजी जल्मी यांच्यासह इतर ‘एसटी’ बांधवांनी व्यक्त केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com