Goa Crime
Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: अल्पवयीन शाळकरी मुलीवर बलात्कार प्रकरणी पर्वरीतील एकास अटक

Akshay Nirmale

Goa Crime: गोव्यातील एका शाळेत शिक्षक आणि समुपदेशकांशी बोलताना एका विद्यार्थिनीने तिच्यावर बलात्कार झाल्याची माहिती दिली होती. या प्रकरणातील संशयिताला म्हापसा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

दीपक सुरेश रेडकर (वय 48) असे संशयित आरोपीचे नाव आहे. तो सध्या बार्देशमध्ये वास्तव्यास होता. पण तो मूळचा पर्वरी येथील आहे. त्याला बुधवारी 3 जानेवारी रोजी म्हापसा पोलिसांनी अटक केली.

मार्च 2023 मध्ये हा प्रकार घडला होता. त्याचवेळी पीडीत मुलीच्या आईने याबाबत तक्रार दाखल केली होती.

संबंधित मुलगी आरोपीच्या घरी गेली होती तेव्हा वासनांध दीपक रेडकर याने या 16 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला.

भेदरलेल्या मुलीने घडला प्रकार शाळेतील शिक्षक, समुपदेशकांना सांगितला. समुपदेशकांशी बोलताना संबंधित मुलीने तिला बोर्डिंग किंवा हॉस्टेलवर ठेवावे, अशी विनवणी केली होती. त्यावर तिच्याशी अधिक बोलल्यावर शिक्षकांना हा धक्कादायक प्रकार कळाला.

या प्रकरणी म्हापसा पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. गोवा चिल्ड्रन्स अॅक्ट तसेच पॉक्सो नुसारही गुन्हा दाखल करण्यात आला होता.

एसडीपीओ जिवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाला पोलिस निरीक्षक शितकांत नाईक यांनी पोलिसांची विविध पथके तयार करून या प्रकरणातील संशयिताला ताब्यात घेतले.

खबरे आणि तंत्रज्ञानाद्वारे माग काढत पोलिसांनी ही कामगिरी केली. म्हापसा येथून रेडकर याला ताब्यात घेतले गेले आहे. या पथकात पोलिस उपनिरीक्षक सुनील पाटील, विराज कोरगावकर, हेड कॉन्स्टेबल सुशांत चोपडेकर, अल्वितो डीमेलो, राजेश कांदोळकर यांचा समावेश होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji News : वेश्या व्यवसायातील २१ कोटी हवालाद्वारे परदेशात; मनी लॉंड्रिंग प्रकरणाचा पर्दाफाश

Panaji News : मळा-पणजीतील शाळेलाही बजावली नोटीस; अतिरिक्‍त शुल्‍क आकारणी प्रकरण

Goa Rain Update : ‘अवकाळी’सोबत उद‌्भवली वीज खंडित होण्याची समस्‍या

Goa News : धार्मिक भावना दुखावल्‍याने भाविक संतप्‍त; दोघींना अटक

IPL 2024 Playoffs Full Schedule: कोण कोणाशी भिडणार, कधी होणार फायनल? वेळ, तारीख, मैदान प्लेऑफचे संपूर्ण वेळापत्र

SCROLL FOR NEXT