Goa Crime  Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: प्लॉटच्या देण्याच्या आमिषाने 3.5 कोटी लुबाडले; आरोग्य विभागातील कर्मचाऱ्याला पत्नीसह अटक

होंडा येथील 25 जणांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती तक्रार

Akshay Nirmale

Goa Crime: प्लॉट मिळवून देण्याचे आमिष दाखवून फोंड्यातील रहिवाशाची 10 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आरोग्य विभागातील मल्टीटास्किंग कर्मचारी विजयनाथ गावडे आणि त्याची पत्नी विदिशा गावडे यांना मंगळवारी अटक करण्यात आली.

होंडा येथील 25 जणांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेऊन गावडे दाम्पत्याकडून फसवणूक झाल्याची तक्रार केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

या दोघांनी फ्लॅट विकण्याच्या बहाण्याने या लोकांकडून सुमारे साडेतीन कोटी रुपये उकळले, असे सावंत यांनी सांगितले.

गावडे यांनी सुमारे एक वर्षापूर्वी फोंडा येथील भिवा गवस यांच्याकडून 10 लाख रुपये स्वीकारल्याचा आरोप आहे.

मात्र, आजतागायत गावडे यांनी त्यांना ना भूखंड दिला, ना पैसे परत केले, असे गावडे यांनी फोंडा पोलिसांत दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. त्यानंतर या जोडप्याविरुद्ध, होंडा, सत्तरी येथील रहिवाशांनी एफआयआर दाखल केला होता. आता त्याला अटक करण्यात आली आहे.

काही पीडितांनी गावडेला 10 लाख रुपयेही दिल्याचे सांगितले, तर काहींनी त्याला आणखी पैसे दिल्याचे सांगितले. बहुतेकांनी वर्षभरापूर्वी पैसे दिल्याचे सांगितले. या प्रकरणाचा तपास करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्याचे सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

मंगळवारी सकाळी तक्रारदारांनी सांखळी येथील निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी त्यांची कैफियत मुख्यमंत्र्यांसमोर मांडली होती. दोन ते तीन वर्षांपासून गावडे यांनी तक्रारदारांच्या पैशाबाबत काहीही नाव काढले नव्हते.

ना त्यांना पैसे परत दिले ना त्यांना प्लॉट दिला. विजयनाथ याला पत्नीही साथ देत होती, असा संशय आहे. त्यामुळे दोघांनाही अटक गोव्यातील कन्स्ट्रक्शन कंपनीचे 17 कोटी रूपये स्वतःच्या खात्यात केले ट्रान्सफर; फोन स्विच ऑफ करून झाला फरार...करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: क्रूर पती! 'दृश्यम' चित्रपट पाहिला आणि रचला पत्नीच्या खुनाचा कट; गळा दाबून हत्या, पुरावा मिटवण्यासाठी भयानक कृत्य

Terrorist Attack: दहशतवादी कटाचा पर्दाफाश! डॉक्टरच्या घरातून 300 किलो RDX आणि AK-47 जप्त; तपास यंत्रणांची धावपळ

Wasim Akram: "उनको गेंदबाजी करना मतलब एक परीक्षा..." वसीम अक्रमने भारतीय क्रिकेटपटूबाबत केलेलं विधान चर्चेत

"नशीब मी गोव्यात राहतो! दिल्लीची घाणेरडी हवा पचवणं कठीण झालंय", माजी क्रिकेटपटू जाँटी ऱ्होड्सचं Tweet Viral

Museum of Goa Exhibition: ख्रिसमस ट्री, नरकासुर, माटोळी; गोव्यातील उत्सवांचा आरसा

SCROLL FOR NEXT