Goa Cricket Association Dainik Gomantak
गोवा

Goa Sports: शालेय क्रिकेट स्पर्धेत 'जीसीए'ची दमछाक! राज्यस्तरीय अंतिम लढती प्रलंबित

Goa Cricket Association: जीसीएची उत्तर विभागीय १४ वर्षांखालील अध्यक्षीय करंडक व १६ वर्षांखालील दिलीप सरदेसाई करंडक स्पर्धा ३० मे रोजी संपली.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: गोवा क्रिकेट असोसिएशनची (जीसीए) २०२५-२६ मधील १४ वर्षांखालील आणि १६ वर्षांखालील आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा घेताना दमछाक झाली असून जून महिना सुरू होऊनही मागील वेळच्या या दोन्ही स्पर्धा पूर्ण करण्यास संघटनेला अपयश आले. त्यामुळे शालेय स्पर्धांचा उद्देश पूर्णपणे फसल्याचे स्पष्ट झाले आहे.

जीसीएची उत्तर विभागीय १४ वर्षांखालील अध्यक्षीय करंडक व १६ वर्षांखालील दिलीप सरदेसाई करंडक स्पर्धा ३० मे रोजी संपली. त्यापूर्वी एप्रिल महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात दक्षिण विभागीय स्पर्धा झाली होती. दोन्ही विभागांतील विजेते संघ राज्य अजिंक्यपदासाठी खेळणार आहेत, पण जीसीएला १४ वर्षांखालील व १६ वर्षांखालील राज्य अंतिम लढतीसाठी अजून दिवस व मैदान सापडलेले नाही.

त्यामुळे स्पर्धा पूर्ण होण्याबाबत संभ्रामावस्था आहे. २०२६-२७ शैक्षणिक वर्ष ६ जून रोजी सुरू होत आहे, परंतु जीसीएच्या मागील शैक्षणिक वर्षातील स्पर्धाच अपूर्ण आहेत. त्यातच सध्या अधूनमधून पाऊस पडत असल्यामुळे राज्यस्तरीय अंतिम लढती कधी आणि कशा होणार याबाबत स्पष्टता नाही.

यासंबंधी ‘जीसीए’कडून कारण जाणून घेतले असता, विद्यार्थ्यांच्या परीक्षा, नंतर उन्हाळी सुट्टी यामुळे शालेय स्पर्धांचे वेळापत्रक विस्कळीत झाले. संबंधित शाळांच्या शिक्षकांकडूनही वेळोवेळी सबबी देण्यात आल्यामुळेही स्पर्धेचे वेळापत्रक कोलमडले. साहजिकच स्पर्धा वेळेत पूर्ण करणे शक्य झाले नसल्याचे संघटनेने मान्य केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT