पर्वरी ः पत्रकार परिषदेत बोलताना जीसीए अध्यक्ष विपुल फडके. बाजूस संयुक्त सचिव रुपेश नाईक. Dainik Gomantak
गोवा

GCA News: राज्यस्तरीय दीडशे क्रिकेट पंच तयार ठेवण्याचे गोवा क्रिकेट असोसिएशनचे उद्दिष्ट

ऑक्टोबरच्या मध्यास 2023-24 मोसम सुरू

किशोर पेटकर

Goa Cricket Association: गोवा क्रिकेट असोसिएशनने (जीसीए) राज्यातील सक्रिय क्रिकेट पंचांची संख्या वाढविण्याचे ठरविले असून संघटनेच्या विविध स्पर्धांसाठी आवश्यक पंच उपलब्ध व्हावेत यादृष्टीने दीडशे राज्यस्तरीय पंच तयार ठेवण्याचे उद्दिष्ट बाळगले आहे, तसेच राज्यातील स्कोअरर्सची संख्याही वाढविण्यात येईल, अशी माहिती जीसीए अध्यक्ष विपुल फडके यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

या वेळी जीसीए संयुक्त सचिव रुपेश नाईक उपस्थित होते. जीसीएचा राज्यस्तरीय 2023-24 मोसम 15 ऑक्टोबरपासून सुरू केला जाईल, अशी माहिती रुपेश यांनी दिली. आंतरशालेय स्पर्धेने मोसमाची सुरवात होईल.

त्यापूर्वी एक ऑक्टोबरपर्यंत पंच परीक्षा व निकाल प्रक्रिया पूर्ण केली जाईल. परीक्षेत मिळणाऱ्या गुणांनुसार पंचांनी प्रीमियर लीग, विभागीय आणि शालेय स्पर्धांसाठी पंचगिरी करण्यासाठी विभागणी केली जाईल. गतमोसमात जीसीएकडे 81 सक्रिय पंचांनी नोंदणी होती, असेही रुपेश यांनी सांगितले.

क्रिकेट पंचांसाठी नऊ व दहा सप्टेंबरला सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच या कालावधीत पर्वरी येथील जीसीए कार्यालयात कार्यशाळा घेण्यात येईल. 40 वर्षांखालील उमेदवार पंच परीक्षा देऊ शकेल. त्यांना संबंधित पंच परीक्षेसाठी गुगल फॉर्मद्वारे प्रवेशिका सादर करावी लागेल.

गोव्याच्या माजी क्रिकेटपटूंनी मोठ्या प्रमाणात पंचगिरीत यावे असे जीसीएला वाटते. गोव्यातील क्रिकेट पंच तांत्रिकदृष्ट्या कौशल्यसंपन्न बनावेत आणि त्यांना राष्ट्रीय पातळीवर संधी मिळावी यासाठीही प्रयत्न आहेत, असे विपुल यांनी नमूद केले.

इतर महत्त्वाचे मुद्दे

- जीसीएच्या विविध स्पर्धांतील सामन्यांसाठी स्कोअरिंग अॅप

- डिसेंबरपासून स्कोअरिंग अॅप सुरू करण्याचे लक्ष्य

- 14 वर्षांखालील मुलांसाठी पर्वरी येथे खुली निवड चाचणी

- 11 रोजी दक्षिण, तर 12 रोजी उत्तर विभागीय चाचणी सकाळी 9.30 वाजल्यापासून

- 1 सप्टेंबर 2009 रोजी किंवा नंतर जन्मलेला खेळाडू चाचणीसाठी पात्र

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT