<div class="paragraphs"><p>Goa Covid Update: The third wave of corona in Goa</p></div>

Goa Covid Update: The third wave of corona in Goa

 

Dainik Gomantak 

गोवा

गोव्यात 'कोविडची' तिसरी लाट.. तज्ज्ञांचा इशारा!

दैनिक गोमन्तक

Goa Covid Update: राज्यात करोना प्रकरणे मागील दोन महिन्यापेक्षा दुप्पट वेगाने होत असल्याचे निदर्शनास आणून राज्याचे महामारी तज्ज्ञ डॉ उत्कर्ष बेटोडकर यांनी शनिवारी सांगितले; तसेच गोवा महामारीच्या तिसऱ्या लाटेकडे वाटचाल करत आहे. “COVID-19 ची प्रकरणे निश्चितपणे वाढू लागली आहेत आणि वक्रातील ही प्रारंभिक वाढ आपल्याला तिसऱ्या लाटेकडे घेऊन जाईल. राज्यात जास्तीत जास्त प्रकरणे कधी वाढतील मिळतील हे आम्हाला माहित नाही, परंतु ते निश्चितपणे फार दूर नाही. आपण 100 टक्के तिसऱ्या लाटेकडे वाटचाल करत आहोत” अशी माहिती डॉ बेटोडकर (state epidemiologist Dr Utkarsh Betodkar) यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

कॉर्डेलिया (cordelia crusise) क्रुज मधून आलेले अनेक प्रवासी करोना बाधित

नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार गोव्यात कोरोना बाधितांच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. त्यातच मुंबईतून गोव्यात कॉर्डेलिया बोटीतून आलेल्या 2000 प्रवाशांपैकी अनेकजण कोरोनाबाधित असल्याची माहिती समोर येत आहेत. बोटीतील प्रवाशांची चाचणी करून मगच त्यांना गोव्यात सोडण्याचे आदेश गोवा सरकारने (Goa Government) बोट व्यवस्थापनाला दिले आहेत. यामुळे अजूनही गोमंतकीयांवर कोरोनाची टांगती तलवार कायम आहे. याबाबत पुढील काय अधिकृत माहिती सामोर येते, याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

गोव्यातर्फे जिनॉम सिक्वेन्सिंग मशीन देण्याची मागणी

आज केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडविया (Dr. Mansukh Mandaviya) यांनी सर्व राज्यांची आढावा बैठक घेतली. कोविड-19 प्रतिबंधात्मक उपाययोजना, प्रतिसाद आणि लसीकरण (Vaccination) योजनेचे पुनरावलोकन करण्यासाठी ह्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. आभासी पद्धतीने (Virtual Meeting) ही बैठक पार पडली. गोव्याचे आरोग्यमंत्री डॉ. विश्वजित राणेही ह्या बैठकीला उपस्थित होते. यामध्ये ओमिक्रॉन (Omicron) संदर्भात नियमावली जारी करण्याची तसेच कोविड-19 चाचणीसाठी (Corona Test) जिनॉम सिक्वेन्सिंग मशीन देण्याची मागणी गोव्यातर्फे करण्यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धूमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT