नवोदित बालकीर्तनकार तयार व्हावेत: सभापती पाटणेकर

कीर्तन परंपरेला मोठी संस्कृती असून, ही परंपरा पुढे नेण्यासाठी नवोदित बाल कीर्तनकार तयार होणे आवश्यक आहे. असे मत डिचोलीचे आमदार तथा सभापती राजेश पाटणेकर यांनी डिचोलीत बोलताना व्यक्त केले.
Dicholim: Beginner Balkirtankar should be ready

Dicholim: Beginner Balkirtankar should be ready

Dainik Gomantak

Published on
Updated on

Dicholim: कीर्तन परंपरेला मोठी संस्कृती असून, ही परंपरा पुढे नेण्यासाठी नवोदित बाल कीर्तनकार तयार होणे आवश्यक आहे. असे मत डिचोलीचे आमदार तथा सभापती राजेश पाटणेकर (Rajesh Patnekar) यांनी डिचोलीत बोलताना व्यक्त केले.

हरिभक्त परिषद गोमंतक आयोजित 42 व्या कीर्तनकार स्नेहसंमेलनाच्या उदघाटन सोहळ्यात ते प्रमुख पाहूणे या नात्याने बोलत होते. शांतारामनगर-बोर्डे येथील वृंदा दीनानाथ तारी सभागृहात हे संमेलन सुरु आहे.

Dicholim: Beginner Balkirtankar should be ready

मांद्रेत सूर्योदयापर्यंत चालल्या 31 डिसेंबरच्या पार्ट्या

समाज प्रबोधनाचे माध्यम

प्रमुख वक्ते या नात्याने बोलताना गोवा विद्यापीठाचे (Goa University) मराठी विभाग प्रमुख प्रा. विनय बापट यांनी कीर्तन हे समाज प्रबोधनाचे माध्यम आहे. असे सांगून कीर्तन परंपरेविषयी उपयुक्त माहिती कथन केली.

Dicholim: Beginner Balkirtankar should be ready

मांद्रेत सूर्योदयापर्यंत चालल्या 31 डिसेंबरच्या पार्ट्या

स्नेहसंमेलनाचे थाटात उदघाटन

श्री सिद्धिविनायक मंदिराकडून नामदिंडी झाल्यानंतर श्री नारदमूर्तीचे संमेलनस्थळी आगमन आणि पूजन होणार करण्यात आले. वैदिक प्रार्थना झाल्यानंतर नारदिय कीर्तन विद्यालय वाळपईच्या बालकीर्तनकार स्वतेजा कुंभार हिने मंगलाचरण सादर केले. वेदमूर्ती तथा ज्येष्ठ कीर्तनकार ह. भ. प. नारायणबुवा फडके यांच्या हस्ते या स्नेहसंमेलनाचे उदघाटन करण्यात आले.

यावेळी संमेलनाध्यक्ष ह. भ. प. भालचंद्रबुवा सिद्ध्ये, ह. भ. प. आनंदबुवा घैसास, हरिभक्त परिषदेचे अध्यक्ष उदयबुवा फडके, स्वागताध्यक्ष दीनानाथ तारी आदींची उपस्थिती होती. उदयबुवा फडके यांनी मनोगत व्यक्त केले. दीनानाथ तारी यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन देवेंद्र साठे यांनी केले. यावेळी आनंदबुवा घैसास यांच्या पुस्तकाचे प्रकाशन झाले.

Dicholim: Beginner Balkirtankar should be ready

मडगावसाठी योजना फक्त कागदावरच?

उदघाटन सत्रानंतर ह. भ. प. किरणबुवा तुळपुळे यांच्या कीर्तनाने स्नेहसंमेलनाला सुरवात झाली. सायंकाळच्या सत्रात बालकीर्तनकार कु. सायली भिडे आणि कु. आभा पित्रे यांची कीर्तन जुगलबंदी रंगली. नंतर कीर्तनचक्रीत ह. भ. प. उत्कर्षा रेवाडकर, नूतन रेवाडकर, श्रेयस गाडगीळ, प्राजक्ता जोशी, ह. भ. प. कृष्णा गावस आणि ह. भ. प. भालचंद्र भावे यांचा सहभाग होता. ह. भ. प. दीनानाथ तारी, आणि अन्य कीर्तनकारांचे कीर्तन झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com