Goa Corona Update
Goa Corona Update  Dainik Gomantak
गोवा

Goa Covid Update: कोरोनाचे नवे 120 रुग्ण

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यात आज सोमवारी 903 कोरोना संशयितांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी 120 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात 85 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 946 इतकी झाली आहे.

आज दिवसभरात कोरोनामुळे कोनाचाही बळी गेला नसल्याने बळींचा आकडा 3955 कायम आहे. राज्यात आतापर्यंत 253136 नागरिकांना कोरोनाची बाधा झाली असून यापैकी 2,48,261 लोक पूर्णपणे बरे झाले असून बरे होण्याचे प्रमाण 98.06 टक्के आहे.

Nagargaon मध्ये मोबाईल टॉवर भाडे घोटाळा झाल्याचा आरोप

पणजी: सर्वांत युवा सरपंच म्हणून बहुमान मिळवणारे नगरगाव-सत्तरी पंचायतीचे माजी सरपंच पराग खाडिलकर यांच्या सन 2017 ते 2018 या कार्यकाळात मोबाईल टॉवर करारविषयक आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप होत आहे. या संदर्भात स्थानिक ग्रामस्थ अर्जुन गुरव यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.

गुरव यांनी तक्रारीत नमूद केले आहे की, माहिती अधिकारातून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार पंचायत नोंदीप्रमाणे नगरगाव पंचायत कार्यक्षेत्रात सात टॉवर आहेत. त्‍यात भारत संचार निगमचे टॉवर, इंडस टॉवर, रिलायन्स, जिओ, इफॉकॉम लिमिटेडचा समावेश आहे. परंतु, पंचायतीने टॉवर मालक आणि ज्या जमीन मालकांच्या जागेत हे टॉवर आहेत त्यांच्याकडून कोणतेही भाडे अथवा कर घेतलेला नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

इंजिनिअरिंग ड्रॉपआऊट विद्यार्थ्याने Chat GPT च्या मदतीने सुरु केली बनावट कॅसिनो वेबसाईट, गोवा पोलिसांनी केली अटक

PM Modi ON UCC: ‘’गोव्यातील लोक एक सारखे कपडे घालतात का?’’ समान नागरी कायद्याच्या प्रश्नावर मोदी स्पष्टच बोलले

United Nations: इस्रायलच्या समर्थनार्थ पहिल्यांदाच UN बैठक, अमेरिकेने दिला पूर्ण पाठिंबा; इस्त्रायली लष्कर राफाह शहरात घुसले!

SSC Result 2024 : पेडणे तालुक्यातील ३२ पैकी १५ शाळांचा निकाल १०० टक्के

Land Grabbing Case: गोवा जमीन हडप प्रकरण; ईडीची 36 जणांविरोधात मनी लाँड्रिंगची तक्रार

SCROLL FOR NEXT