स्टुडंट्स फॉर डेव्हलपमेंट (SFD) ने देशभरातील "वृक्षमित्र" नोंदणीद्वारे एक कोटी वृक्ष लागवडीची मोहीम सुरू केली आहे. त्याच अनुषंगाने SFD गोवा युनिटने सोमवारी गोवा विद्यापीठ परिसरात वृक्षारोपण मोहिमेचे आयोजन केले होते.
(Plantation of trees is important say Goa University Vice-Chancellor Dr. Memon)
या वृक्षारोपण मोहिमेचे उद्घाटन गोवा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. हिरालाल मेनन यांनी केले. यावेळी भारत सरकारचे सहाय्यक सॉलिसिटर जनरल अॅड. प्रवीण फळदेसाई, गोवा विद्यापीठाचे कुलसचिव प्रा. व्ही.एस. नाडकर्णी, अधिवक्ता परिषदेचे अॅड रविराज चोडणकर अभाविप कोंकण प्रदेश उपाध्यक्ष श्री विलास सतरकर विद्यापीठातील डीन, प्राध्यापक , उच्च माध्यमिक शाळा, माध्यमिक शाळा शिक्षक उपस्थित होते.
संपूर्ण गोव्यातील विविध महाविद्यालयातील 500 हून अधिक विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण मोहिमेत उत्साहाने सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी विद्यापीठ परिसरात 600 हून अधिक रोपांची लागवड केली. यावेळी बोलताना गोवा विद्यापीठाचे कुलगुरू, प्रा. हरिलाल मेनन म्हणाले, "समुदायासाठी वृक्षारोपण खूप महत्वाचे आहे. वृक्षारोपण ही चळवळ होणे गरजेचे आहे. हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी खूप मदत करेल."
यावेळी बोलताना अॅड. प्रवीण फळदेसाई म्हणाले की , "या मोहिमेसाठी पुढे आलेल्या विद्यार्थ्यांचा उत्साह पाहून मला आनंद झाला. आपण सर्वांनी केवळ झाडे लावण्याचीच नव्हे तर त्यांचे संगोपन करण्याची शपथ घेऊ या." यावेळी वृक्ष लागवड व संवर्धन शपथ धनश्री मांद्रेकर यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाश नाईक यांनी केले तर आभारप्रदर्शन सर्वेश तळवडकर यांनी केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.