CM Dr Sawant (Goa Covid-19)
CM Dr Sawant (Goa Covid-19) Dainik Gomantak
गोवा

Goa Covid-19: मृतांच्या खऱ्या आकडेवारीत पुन्हा घोळ

Dainik Gomantak

पणजी, मडगाव: राज्यात कोविड बळींची (Goa Covid-19 Death) संख्या नियंत्रणाखाली असल्याचे दाखविण्यासाठी सरकार मृतांचा आकडा लपवित असल्याचा आरोप विरोधक (Opposition allege) आजवर करीत होते त्यात तथ्य असल्याचे बुधवारी उघड झाले आहे. दक्षिण गोव्यात गेल्या वर्षभरात झालेल्या कोविड मृतांची खरी आकडेवारी (South Goa Covid-19 Death) आतापर्यंत जाहीर केलीच नव्हती हे आता सरकारी बुलेटिनमधूनच स्पष्ट झाले. यावर विरोधकांनी आक्रमक (Opposition Aggressive) भूमिका घेतली असून या प्रकाराबाबत सरकारला धारेवर धरले आहे.

गेल्या दोन दिवसांच्या बुलेटिनच्या आकडेवारीत मोठी तफावत असल्याचे लक्षात आल्यानंतर दक्षिण गोव्यातील 68 मृतांची आकडेवारी नव्याने नोंद केल्याचे दिसून आले. आश्चर्य म्हणजे, गोमेकॉतील आजपर्यंत कोविडमुळे मृत्यू झालेल्या, पण आरोग्य यंत्रणेकडे नोंद न झालेल्या मृतांची संख्या ही 200 पेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे. 14 सप्टेंबर रोजी आरोग्य खात्याने जी अधिकृत माहिती जाहीर केली होती त्यात मृतांची आकडेवारी 3219 अशी दाखविण्यात आली होती. 15 सप्टेंबर रोजी फक्त दोघांचा कोविडमुळे मृत्यू झालेला असतानाही ही मृतांची संख्या 3289 एवढी वाढल्याचे दिसून आले. ऑगस्ट 2020 ते जुलै 2021 या कालावधीत दक्षिण गोव्यात कोविडमुळे 68 जणांच्या मृतांची आकडेवारी आता नोंद केल्याची टीप या बुलेटिनमध्ये आहे. मात्र हे 68 बळी कशामुळे मृत पावले याचा उल्लेख यात नाही.

म्हणून झाला घोळ : डॉ. दीपा कुरैय्या यांच्याकडून स्पष्टीकरण

हे 68 मृत इस्पितळातील नसून पोलिस केसेसमधील आहेत. रस्त्यावर किंवा अपघातात तसेच अन्य कारणांनी मृत पावलेल्या व्यक्तींपैकी 68 व्यक्ती कोविडबाधित होत्या. मात्र या मृतांची आकडेवारी आरोग्य खात्याला न्यायवैद्यक विभागातून दिली न गेल्याने हा घोळ झाला आहे. ही आकडेवारी सादर करण्याची जबाबदारी इस्पितळाची नव्हती तर ती पोलिस किंवा न्यायवैद्यक विभागातून देण्याची गरज होती. मात्र विधानसभेत कोविड मृतांच्या आकडेवारीसंदर्भात प्रश्न विचारला असता त्या संदर्भात माहिती गोळा करताना या 68 मृतांची माहिती मिळाली, असे दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाच्या प्रमुख डॉ. दीपा कुरैय्या यांनी सांगितले.

प्रश्‍न उपस्थित

जर ते कोरोनामुळे मृत पावले असतील तर त्याची आकडेवारी वेळोवळी सरकारी आकडेवारीला का जोडली गेली नाही. रोज ही संपूर्ण आकडेवारी देशपातळीवरील आकडेवारीला जोडली जाते आणि ही यंत्रणा पूर्णतः डिजिटल पद्धतीने जोडली आहे. त्यामुळे रोजची नोंद रोज करणे अनिवार्य असतानाही हा घोळ कशामुळे झाला आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यापूर्वीसुद्धा सरकारने अशाच पद्धतीने मृत्यूंच्या आकडेवारीत घोळ घातलेला आहे.

आरोग्य विभागातर्फे असे बुलेटिन रोज पाठविले जाते. या अहवालात रोजच्या आकडेवारीचा समावेश केला जातो. 15 सप्टेंबर रोजी फक्त दोघांचा कोविडमुळे मृत्यू झालेला असतानाही ही मृतांची संख्या 3289 एवढी कशी झाली, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

ही बनवाबनवी...

ही सरकारची बनवाबनवी आहे. कोरोना मृत्यूची आकडेवारी वेळोवेळी का अपडेट केली नाही ? ही केवळ दक्षिण गोव्याची आकडेवारी असली तर उत्तर गोव्याची नेमकी किती आहे? अशा घटनांमुळे कोरोनाच्या काळात सरकार नागरिकांना सेवा सुविधा देण्यात अपयशी ठरल्याचे पुन्हा सिद्ध होत आहे.

- दिगंबर कामत, विरोधी पक्षनेते

हे सरकार 100 टक्के खोटारडे आहे, हे पुन्हा एकदा सरकारी आकडेवारीतूनच स्पष्ट झाले आहे. केवळ दिल्लीश्वरांची शाबासकी मिळविण्यासाठी सावंत सरकार खरी माहिती दडवून आकडेवारी प्रसिद्ध करीत आहे, असे आम्ही यापूर्वी म्हटले होते. संसदेत ऑक्सिजन अभावी एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही, अशी खोटी माहिती देण्यात आली आहे.

- विजय सरदेसाई, गोवा फॉरवर्ड.

सरकारचा खोटेपणा रोज समोर येतोय. हे सरकार रात्री बनलेले असल्यामुळे ते खोटेपणा करण्यात पुढे असणारच. कोरोनाच्या काळात जनतेला मृत्यूच्या खाईत सोडण्याचे पाप या सरकारने केले आहे. आता मृत्यूची आकडेवारीही लपवत आहेत. त्यामुळे जनताच त्यांना धडा शिकवेल.

- गिरीश चोडणकर, काँग्रेस नेते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa And Kokan Today's Live News: पेडणे खून प्रकरण; आजगावकर यांचा सखोल चौकशी करण्याची मागणी

Ponda News : दारूच्या नशेत पर्यटकांची दादागिरी; दाभाळ येथील प्रकार

Dengue News : डेंग्यू निर्मूलनासाठी लोकांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे : आरोग्य उपसंचालक डॉ.कल्पना महात्मे

Lairai Devi jatra 2024 : ‘लईराई’चा कौलोत्सव अभूतपूर्व उत्साहात; शिरगावात भक्तिमय वातावरण

Cashew Production Declined: काजू पीक घटले; दारूभट्ट्या थंडावल्या, हंगाम अंतिम टप्प्यात

SCROLL FOR NEXT