Vaccination: राज्यातील १ लाख ७० हजार नागरिक येत्या आठ दिवसात कोरोना प्रतिबंधक लसीला दुसरा डोस (Covide - 19 Vaccination) घेणार आहेत. कारण त्यांचा पहिल्या डोसनंतचा ९० दिवसाचा काळ येत्या आठवड्यात संपत आहे. असी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Dr. Pramod Sawant) यांनी आज दिली. पर्वरी येथे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे (Health Minister Vishwajit Rane), आरोग्य संचालक डॉ. जुझे डिसा व गोवा वैद्यकिय महाविद्यालयाचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांच्या उपस्थितीत आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यानी वरील माहिती दिली. राज्यातील १८ वर्षावरील सर्व नागरिकांना ३१ ऑक्टोबर पर्यंत दोन्ही डोस देण्यासाठी उद्यापासून उद्यापासून टीका उत्सव ३.२ चे आयोजन करण्यात आले आहे. असेही मुख्यमंत्र्यानी सांगितले.
राज्यातील १८ वर्षावरील १०० टक्के नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस देण्यात आलेला असून ३१ ऑक्टोबर पर्यंत दुसरा डोस देऊन १०० टक्के लसीकरण करणारे गोवा देशातील पहिला राज्य ठरणार आहे. राज्यात १८ वर्षावरील मतदार ११ लाख ४० हजार आहेत. तर नव्या सेन्सेक्सनुसार १८ वर्षावरील नागरिकांची संख्या ११ लाख ६६ हजार आहे. राज्यात आत्तापर्यंत ११,८८,८९१ येवढ्या लोकांना पहिला डोस देण्यात आला असून ही टक्केवारी १०२ टक्के होत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. राज्यात ५,०२,१४४ लोकांना दुसरा डोस देण्यात आलेला असून ही टक्केवारी ४३.०७ ठरते.
पंतप्रधान १८ रोजी गोव्यातील कोविड योध्यांशी थेट संवाद साधणार असल्याचे सांगून उद्या ता.१६ सप्टेंबरपासून टीका उत्सव ३.२ राज्यात सुरु होणार असून ज्यांनी पहिला किंवा दुसरा डोस घेतलेला नाही त्यांनी तो त्वरीत घ्यावा. कुठल्याही केंद्रात डोस घेता येईल. असे आवाहन मुख्यमंत्र्यानी यावेळी केले. यावेळी मुख्यमंत्र्यानी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्यासह आरोग्य खात्याचे संचालक, गोमेकॉचे डिन व समस्त डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आणि कोविड योध्यांचे सरकारद्वारे अभिनंदन केले. दरम्यान गेल्या आठ दिवसात जे १० कोरोना बाधित मरण पावले त्यातील ९ व्यक्तींनी कोरोना प्रतिबंधक लसीचा एकही डोस घेतला नव्हता. अशी माहिती. मुख्यमंत्र्यानी यावेळी दिली.
टीका नको टीका उत्सवात लोकांना सहभागी करा
गोवा सरकारने पहिला डोस १०० टक्के दिल्याचे जाहिर केल्यानंतर विरोधकांनी विशेषतः विरोधी पक्षनेते दिगंबर कामत व गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी सरकारवर टीका केली व गोव्याचीच बदनामी सुरु केली. एखादी व्यक्ती आपण लस घेणारच नाही, म्हणत असल्यास त्याला सरकार जबरदस्ती करु शकत नाही. आणि त्यांने लस घेतली नाही म्हणून १०० टक्के लसिकरण पूर्ण होत नाही, असेही म्हणता येणार नाही. असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी यावेळी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.