Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: दिल्लीतील तरुणीशी मैत्री करुन लैंगिक शोषण, वास्कोतील आरोपीला कोर्टाने सुनावली 10 वर्षांची शिक्षा

Human Trafficking Case Goa: दिल्लीतील एका तरुणीशी मैत्री करुन तिचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी वास्को येथील मोईनुद्दीन पठाण (राहणार, नवे वाडे) याला प्रथम श्रेणी न्यायालयाने दहा वर्षांचा सश्रम कारावास सुनावण्यात आली.

Manish Jadhav

वास्को: दिल्लीतील एका तरुणीशी मैत्री करुन तिचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी वास्को येथील मोईनुद्दीन पठाण (राहणार, नवे वाडे) याला प्रथम श्रेणी न्यायालयाने दहा वर्षांचा सश्रम कारावास आणि 50 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास त्याला अतिरिक्त तीन महिने सश्रम कारावास भोगावा लागणार आहे.

वास्को पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 2019 मध्ये घडली होती. आरोपी मोईनुद्दीन पठाण याची ओळख दिल्लीतील एका मुलीशी झाली होती. ती तरुणी नोकरीच्या शोधात गोव्यात आली असता, आरोपीने तिला आपल्या घरी आसरा दिला. मात्र, काही दिवसांनी त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यास सुरुवात केली. इतक्यावरच न थांबता, पीडित तरुणीला जबरदस्तीने वेश्याव्यवसायात ढकलण्यात आले.

दरम्यान, या त्रासाला कंटाळून पीडित तरुणीने मदतीसाठी पुढाकार घेतला आणि वास्को पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली. या प्रकरणाच्या तपासात एका स्वयंसेवी संस्थेने (NGO) पुढाकार घेत पीडितेला सुरक्षितपणे तिच्या कुटुंबाकडे सोपवले.

न्यायालयात चाललेल्या खटल्यादरम्यान पीडितेच्या जबानीसह पोलिस तपासातील पुरावे निर्णायक ठरले. परिणामी, न्यायालयाने मोईनुद्दीन पठाण याला दोषी ठरवत दहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kushavati District: 'कुशावती' जिल्ह्यामध्ये काणकोणचा समावेश नको, ...अन्यथा तीव्र आंदोलन; श्रीस्थळ येथील बैठकीत ठराव

मोपा विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई! 3.16 कोटींचा अंमली पदार्थ जप्त; बँकॉकहून आलेल्या प्रवाशाला बेड्या

Rivona: सफर गोव्याची! पांडवांचा पदस्पर्श लाभलेले, देवदेवतांची प्राचीन मंदिरे असणारे तपस्वींचे ऋषीवन; हिरवेकंच 'रिवण'

Youth Migration: भारतीयांना खुणावतेय परदेशातील करिअर! 52 टक्के तरुणांचा देश सोडण्याचा विचार; 'टर्न ग्रुप'चा खुलासा

किंग कोहली अन् रोहितच्या फौजेचं व्यवस्थापन आता गोमंतकीयाच्या हाती, महेश देसाईंची टीम इंडियाच्या व्यवस्थापकपदी निवड

SCROLL FOR NEXT