
वाळपई प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांच्या निर्णयानुसार श्रवण बर्वे हत्येप्रकरणी वासुदेव ओझरेकर, देविदास बर्वे आणि उदय बर्वे यांना आठ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
ज्या शिक्षकांना गंभीर आजाराचे निदान झाले आहे त्यांना नियमित वैद्यकीय रजा नाही तर खास वैद्यकीय रजा दिली जाईल या बदलामुळे गंभीर आजारांना तोंड देणाऱ्या शिक्षकांना त्यांच्या आरोग्याच्या समस्या सोडवण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल याची. या गंभीर आजाराच्या रजांसाठी आवश्यक कागदपत्रे आणि मंजुरी शिक्षण विभाग हाताळेल.
बांबोळीमधील कथित बांधकामासाठी गोवा SEIAA कडून वर्ल्डवाइड रिसॉर्ट्स अँड एंट्रेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडला स्टॉप वर्क ऑर्डर जारी
कोलवा पोलीस ठाण्यातील तीन पोलीस कॉन्स्टेबलच्या निलंबनानंतर, पीआय रितेश तारी यांची अचानक बदली करण्यात आली. आता पीएसआय देखील चौकशीच्या कक्षेत आला आहे, लवकरच त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.
दुर्दैवाने सोमवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास जखमी बीबट्याचा मृत्यू झाला. राज्यात वन्य प्राण्यांच्या उपचारांसाठी सुविधांचा अभाव. लवकरच राज्यात एक आधुनिक इस्पितळ उभारण्याच्या चर्चेसाठी लवकरच मुख्यमंत्र्यांशी करणार चर्चा. वन्य प्राण्यांच्या रक्षणासाठी काम करणाऱ्या एनजीओंनाही घेणार ऑन बोर्ड - विश्वजीत राणे,वन मंत्री
फोंडा पोलीस निरीक्षक विजयनाथ कवळेकर यांनी जेष्ठ नागरीकांना सायबर फ्रॉड या विषयी मार्गदर्शन केले.तसेच तुमच्या खात्यातून काहीही पैसे गायब झाल्यास १९३० डायल करून तक्रार करावी असे सांगितले.
पिसुर्ले येथील दामोदर मंगलजी खाण परिसरातील काजू बागायतीला लागलेल्या आगीत सुमारे ६० लाखांचे नुकसान. वाळपई अग्निशमन दलाने तातडीने हस्तक्षेप करत सुमारे २ कोटींची मालमत्ता वाचवली. तसेच आग आटोक्यात आणण्यात यश.
सासष्टी तालुक्यात एफडीएने छापा टाकला, अस्वच्छ परिस्थितीत काम करणाऱ्या बेकरींना काम थांबवण्याचे आणि अनुपालन सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. चिप्स बनवणाऱ्या आणखी एका युनिटला फूटपाथवर धुण्याची सुविधा न वापरता स्वयंपाक करताना आढळून आले. २०,००० रुपयांच्या वस्तू जप्त करण्यात आल्या आणि परवाने मिळेपर्यंत काम थांबवण्यास सांगण्यात आले.
गोकुळवाडी साखळी येथे पेट्रोल पंपसमोर सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे रस्त्याच्या बाजूला करण्यात येणाऱ्या खोदकामावेळी मोठी जलवाहिनी फुटल्याने पाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावरून वाहत आहे. आतापर्यंत हजारो लीटर पाणी वाया गेले असून पाणी पुरवठा विभागाला यची कल्पना देण्यात आली आहे.
बेताळभाटी येथे आयोजित करण्यात आलेल्या धिरयोत जखमी बैलाचा मृत्यू झाल्याची धक्कायक घटना समोर आली आहे. कोलवा पोलिस या प्रकरणाचा तपास करतायेत.
सत्तरी तालुक्यातील सावर्डे पंचायतीची एमआरएफ कचरा शेड ओव्हर फ्लो. कचऱ्याच्या राशी. कचरा व्यवस्थापन मंडळाच्या अधिकाऱ्यांना पंचायतीने विनवणी करुनही अक्षम्य दुर्लक्ष.स्थानिकांमध्ये संताप.ह्या साठलेल्या कचऱ्यामुळे गावात रोगराई पसरण्याची स्थानिकांना भीती.
लाच प्रकरणी कोलवा पोलिस स्थानकातील अमर गावकर, सिद्धेश शिरोडकर आणि सत्यम देसाई यांना निलंबीत करण्यात आले आहे. तिघांना स्क्रॅप डिलरकडून लाच घेतल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. दक्षिण गोव्याचे पोलिस अधीक्षक टीकम सिंग वर्मा यांनी याबाबत निलंबनाचा आदेश जारी केला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.