‘DMF’ निधीचा वापर कोविड व्यवस्थापनासाठी नको Dainik Gomantak
गोवा

Goa Court: ‘DMF’ निधीचा वापर कोविड व्यवस्थापनासाठी नको

निधीचा वापर कोविड व्यवस्थापनासाठी केल्याप्रकरणी गोवा फाऊंडेशनने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

दैनिक गोमन्तक

पणजी: कोविड (Covid-19) कामासाठी जिल्हा खनिज मंडळाचा (DMF) निधी वापरता येणार नाही, असे तोंडी निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने (Goa Court) सरकारला (Government) दिले आहेत. निधीचा (DMF funds) वापर कोविड व्यवस्थापनासाठी केल्याप्रकरणी गोवा फाऊंडेशनने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. यावरील सुनावणी येत्या सोमवारी ठेवण्यात आली आहे. (Goa Court: No use of DMF funds for covid management)

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार, राज्य सरकारने जिल्हा खनिज मंडळ स्थापन केले आहे. या मंडळाकडे लाखो निधी आहे. या निधीचा वापर खाणग्रस्त भागातील लोकांसाठीच करणे आवश्‍यक असताना तो इतर कामासाठी वापर जात असल्यासंदर्भातची याचिका गोवा फाऊंडेशनने सादर केली आहे. 28 मार्च 2020 रोजी खाण खात्याने परिपत्रक काढून या मंडळाचा निधी कोविड व्यवस्थापन मदतीसाठी वापरण्यास मुभा दिली होती. या परिपत्रकालाच याचिकादाराने आव्हान दिले आहे. हे परिपत्रक मागे घेण्याचे तसेच मंडळाचा जो निधी कोविड व्यवस्थापन मदतीसाठी वापरण्यात आला आहे, तो परत करण्याचे निर्देश द्यावेत अशी विनंती केली आहे.

दरम्यान, सरकारने या निधीचा गैरवापर केला आहे अशी बाजू याचिकादाराचे वकील नॉर्मा आल्वारिस यांनी मांडली. मंडळाचा निधी कोविड मदतीसाठी वापरण्याचे त्वरित बंद करण्याचे निर्देश द्यावेत अशी विनंती आल्वारिस यांनी खंडपीठासमोर केली.

खंडपीठाचे निरीक्षण

केंद्र सरकारच्या परिपत्रकात निधीचा वापर इतर कारणासाठी करण्यात येऊ नये असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे याचिकेवर पुढील सुनावणी होईपर्यंत सरकारने कोणताही निधी इतर कामासाठी वळवू नये. या परिपत्रकानुसार सरकारने त्याचे पालन करण्याची गरज आहे. त्यामुळे आणखी निधीचा वापर करू नये तोंडी निरीक्षण खंडपीठाने नोंदवले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ind vs SA WC Final 2025: वर्ल्डकप फायनलपूर्वी मोठी बातमी! लाल मातीची खेळपट्टी भारतासाठी ठरणार धोकादायक? Pitch Report आला समोर

Janjira Fort: 1670 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी अभेद्य जलदुर्गास समुद्रमार्गे वेढा घातला होता; कान्होजी आंग्रे व अजिंक्य जंजिरा

Supermoon 2025: चंद्र येणार पृथ्वीच्या जवळ, दुर्बिणी-टेलीस्कोपचीही गरज नाही; कुठे आणि कसा पाहाल हा 'दुर्मिळ क्षण'?

Lingayat History: 'कलचुरी राजाचा मुख्य मंत्री असलेला बसव', यल्लम्मा आणि लिंगायत पंथाचा इतिहास

King Title Reveal: 'सौ देशों में बदनाम...' शाहरुख खानच्या वाढदिवशी 'किंग'चा दमदार लूक रिलीज; VIDEO तूफान व्हायरल

SCROLL FOR NEXT