Goa: मुख्यमंत्र्यांच्याच मतदारसंघात पिडितेचा वर्षभर अमानुष छळ

पोलिस तक्रारीनंतर युवती आणि तिच्या आई-वडिलांना घराबाहेर काढून ग्रामस्थांनी त्यांच्या घराची मोडतोडही केली
मुख्यमंत्र्यांच्याच मतदारसंघात पिडितेचा वर्षभर अमानुष छळ
मुख्यमंत्र्यांच्याच मतदारसंघात पिडितेचा वर्षभर अमानुष छळDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: एक अत्याचारीत युवती आणि तिच्या कुटुंबीयांना संरक्षणाऐवजी तक्रारीनंतर शासनाच्या अमानुष छळाला वर्षभर सामोरे जावे लागत आहे. मुख्य म्हणजे हा प्रकार दुसऱ्या-तिसऱ्या नव्हे, तर दस्तुरखुद्द मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांच्या मतदारसंघातच घडलेला आहे. (22-year-old girl faces harassment in Goa CM’s constituency)

पाळी-कोठंबी भागात चौगुले खनिज क्षेत्र परिसरात राहाणाऱ्या बावीस वर्षीय युवतीचे हे प्रकरण मानवी हक्क आयोगापर्यंत पोहोचल्यानंतर युवतीची सतावणूक अधिकच वाढली आहे. युवती आणि तिच्या कुटुंबीयांना बेघर करण्याचा चंगच शासनाने बांधल्याचे दिसत असून, ‘बायलांचो साद’ संघटना याप्रकरणी युवतीला आधार देत आहे.

मुख्यमंत्र्यांच्याच मतदारसंघात पिडितेचा वर्षभर अमानुष छळ
Goa Rape Case: रघुपती राघव राजाराम, प्रमोदाक सद्‍बुध्दी दे भगवान

शासनाद्वारे सुरू असलेला छळ थांबलेला नाही

‘बायलांचो साद’ संघटनेच्या नेत्या सबिना मार्टिन्स यांनी या प्रकरणाला वाचा फोडताना प्रशासकीय असंवेदनशीलतेवर संताप व्यक्त केला. लैंगिक शोषण झाल्यानंतर अत्याचारीत युवतीला सरकारने पूर्णपणे साहाय्य करायला हवे होते. मुख्यमंत्र्यांच्या कानावरही हे प्रकरण युवतीच्या आई-वडिलांनी घातले होते. मुख्यमंत्र्यांनी मदतीचे आश्वासन दिले. पण शासनाद्वारे सुरू असलेला छळ थांबलेला नाही, युवती बारावीपर्यंत शिकलेली, होम नर्सिंगचे प्रशिक्षण घेतलेली असूनही ती रोजगारापासूनही वंचित राहिलेली आहे.

चौगुले खाण कंपनीच्या क्षेत्रालगत या युवतीचे घर आहे. तिचे आई-वडील दिव्यांगांमध्ये मोडत असले तरी छोटे-मोठे काम करून त्यांनी मुलीला व तिच्या भावाला वाढवले, शिक्षणही दिले. युवतीने लहानशा कामाला जुंपून घेतले होते. गेल्या वर्षी तिचे लैंगिक शोषण झाले. त्यासंदर्भात तिने पोलिसांत तक्रारही केली असून, अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा देण्याऐवजी शासनाने तिचा छळ आरंभला असल्याची माहिती मार्टिन्स यांनी दिली.

मुख्यमंत्र्यांच्याच मतदारसंघात पिडितेचा वर्षभर अमानुष छळ
Goa Rape Case: पीडितेच्या पालकांना दोष नकाे

आश्रयस्थान बदलण्याच्या घटना घडल्या

पोलिस तक्रारीनंतर युवती आणि तिच्या आई-वडिलांना घराबाहेर काढून ग्रामस्थांनी त्यांच्या घराची मोडतोडही केली, घर मोडकळीस आल्याचे सांगत ते जमीनदोस्त करण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. शासनाचा त्या प्रयत्नांना आशीर्वादही आहे. युवती व तिच्या आई-वडिलांची सोय काही काळासाठी सरकारी प्राथमिक शाळांतून करण्यात आली. पण एकाच ठिकाणी राहायला न देता वारंवार त्यांचे आश्रयस्थान बदलण्याच्या घटना घडल्या आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन पण...

तालुकास्तरीय प्रशासकीय यंत्रणेने चालवलेल्या त्या युवतीच्या छळाची कैफियत आज (बुधवारी) उत्तर गोवा जिल्हाधिकारी अजित राॅय यांच्याकडे ‘बायलांचो साद’ने मांडली. युवतीचे घर डिचोलीतील एका खाण कंपनीच्या हाऊसिंग सोसायटीत आहे. त्या घराच्या दुरुस्तीकामास परवानगी द्यावी, अशी विनंती युवतीने केली आहे. तसेच घरातील सामान वृद्धाश्रमात नेण्यास देण्यासाठी विचार व्हावा, अशीही मागणी युवतीने केली. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणात मामलेदारांशी बोलेन, असे आश्वासन दिले आहे. घरातील साहित्य येत्या शनिवारी वृद्धाश्रमात न्यावे, असे त्यांनी सांगितले असले तरी तेवढे साहित्य वृद्धाश्रमात ठेवता येईल काय, अशी शंका ‘बायलांचो साद’ने व्यक्त केली. युवती व तिच्या भावाला ‘मनरेगा’चे कार्ड मिळवून देण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले असले तरी वृद्धाश्रमात एकदा आत गेल्यानंतर बाहेर जायला मिळेल काय, असा प्रश्न उपस्थित होणार आहे.

अमानुषतेचा कळस

या सगळ्या प्रकारात अमानुषतेचा कळस होत असून, युवतीच्या वृद्ध आई-वडिलांना गळक्या शाळेतून मामलेदारांनी बाहेर काढले. दोघांना दिवसभर अन्नही दिले नाही, हा अमानवीपणा नाही तर काय? असा प्रश्न ‘बायलांचो साद’ने केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com