Anjuna  Dainik Gomantak
गोवा

Anjuna News: हणजूणमध्ये ‘बंद’ची सांगता; दिवसाअखेर व्यावसायिकांनी केलाय 'हा' निर्धार

Ganeshprasad Gogate

Anjuna News: गोवा खंडपीठाने हणजूण पंचायत क्षेत्रातील किनाऱ्यावरील विकास प्रतिबंधित तसेच सीआरझेड परिसरातील बेकायदा 175 बांधकामे सील करण्याचे निर्देश दिले.

त्यानुसार, स्थानिक पंचायत व गटविकास अधिकाऱ्यांनी संबंधित आस्थापनांना टाळे ठोकण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

मात्र, या प्रक्रियेला विरोध करीत आज सोमवारी (ता. 19) ग्रामस्थांनी 'हणजूण गाव बंद'ची हाक दिली होती. काल म्हणजेच रविवारी येथील स्थानिकांनी एकत्र येत स्टारको जंक्शन येथे 'बंद'ची माहिती पत्रकारांना दिली होती.

आज ठरल्याप्रमाणे हणजूणमध्ये ग्रामस्थांनी कडकडीत बंद पाळला. या 'बंद'च्या हाकेला सर्व आस्थापनांनी आणि व्यावसायिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता.

दिवसाअखेर व्यावसायिकांनी आस्थापना सील करण्याबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्याचा निर्धार करत ‘बंद’ची सांगता केली. या बंदमध्ये हणजूण व्यापाऱ्यांचा सक्रिय सहभाग घेतला होता.

'बंद'च्या पार्श्वभूमीवर असं घडलं :

'बंद'च्या सभेवेळी आमदार मायकल लोबो व आरजीचे सर्वेसर्वा मनोज परब यांच्यात शाब्दिक चकमक झालेली पहायला मिळाली. लोबो आणि परब यांच्यातील झालेल्या शाब्दिक चकमकीमुळे काही काळ तणाव निर्माण झाला.

सद्यःस्थितीला परब यांनी सरकारला दोषी धरले. तसेच गोव्यातील जमिनी व व्यावसायिकांना वाचवण्यासाठी सरकारने संरक्षण कायदा अंमलात का आणला नाही, असा जाब परब यांनी लोबोंनी विचारत धारेवर धरलेले पाहायला मिळाले.

मात्र स्थानिकांनी हस्तक्षेप करत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim News: भाडेकरूंची डिचोली पोलिस स्थानकात गर्दी! कार्यक्षेत्रात तपासणी मोहिमेला वेग

'गोवा पोलिस' अंमलीपदार्थांविरोधी गंभीर! 'कोकेन जप्ती'प्रकरणी दिल्ली पोलिसांना करणार सहकार्य

Quelossim: ही तर नौटंकी! केळशीची बदनामी केल्याचा व्हेंझी यांच्‍यावर सरपंचांचा आरोप

Sunburn Festival 2024: धार्मिक स्थळी 'असले' कार्यक्रम नकोच! 'सनबर्न' साठीच्या सभेनंतर ग्रामस्थ ठरवणार दिशा

Israel-Iran War: इस्रायल-इराण युद्धानं सर्वसामान्यांचं बजेट कोलमडणार! भारतासह जगभरातील देशांना बसणार फटका

SCROLL FOR NEXT