रस्ते अपघातांबाबत काँग्रेसचे धरणे आंदोलन; प्रश्नांची उत्तरे मिळेपर्यंत परिवहन विभागात कार्यकर्त्यांचा ठिय्या

Goa Congress: दोन दिवसांपूर्वी अमित पाटकर यांनी मुख्यमंत्री सावंत आणि परिवहन मंत्र्यांवर अपघातांबद्दल टीकास्त्र सोडलं होतं.
Goa Congress
Goa CongressDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Goa Congress: राज्यात नव्या वर्षात (2024) आतापर्यंत 35 जणांचे रस्ते अपघातांमध्ये बळी गेले आहेत. 1 ते 31 जानेवारीपर्यंत 20, तर फेब्रुवारीच्या अंदाजे 20 तारिखपर्यंत १५ जणांचा अपघातांत दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

एका बाजूने राज्य सरकार अपघात टाळण्यासाठी विविध उपाययोजना राबवत असले, तरी दुसऱ्या बाजूने अपघातांची आणि त्यातील बळींची संख्या वाढतच चालली आहे.

याच पार्श्वभूमीवर गोवा प्रदेश काँग्रेसचे अमित पाटकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी पणजीत परिवहन विभागात धरणे आंदोलन सुरु केले आहे.

परिवहन विभागाचे टुरिझम डायरेक्टर सुट्टीवर असल्याने उपस्थित कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करत कार्यकारी संचालकांना बोलावण्याची आंदोलकांची मागणी केली.

घडणाऱ्या अपघातांसंबंधी आमच्या प्रश्नांची उत्तरे मिळेपर्यंत काँग्रेस ठिय्या आंदोलन करणार असल्याचे यावेळी आंदोलकांनी सांगितले.

दोन दिवसांपूर्वी अमित पाटकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि परिवहन मंत्र्यांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून वाढत्या अपघातांबद्दल टीकास्त्र सोडलं होतं.

Goa Congress
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा वाद; सां जुझे दी अरीयाल पंचायतीकडून 'स्टॉप वर्क ऑर्डर' जारी

चांदर येथे झालेल्या भीषण अपघातात दोन जीवलग मित्रांचा बळी गेला. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी सरकारला धारेवर धरले असून रस्ते अपघात रोखण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचा ठपका त्यांनी ठेवला आहे.

चांदर येथील अपघातात मृत पावलेल्या तन्वेश नाईक या तरुणाच्या काकाच्या मालकीच्या ट्रकची धडक त्या दोघांच्या दुचाकीला बसली आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa BJP Mahila Morcha Protest
Gyanesh Kumar Resignation Demand Panaji
Goa Politics
Karapur One Goa Project Protest
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com