Four acquitted in Anmod Ghat murder case Dainik Gomantak
गोवा

Goa Crime Case: दोरीने गळा आवळला, पण मारेकरी कोण? गोव्यात गाजलेल्या 'अनमोड घाट' हत्येचा शेवट; चौघांची निर्दोष सुटका

Anmod Forest Murder Case: १७ जानेवारी २०१९ रोजी अनमोड घाटावर पिकनिकसाठी आलेल्या काही युवकांना खाली खाडीत एक मृतदेह आढळून आला होता.

दैनिक गोमन्तक डिजिटल

मडगाव: अनैतिक संबंधातून प्रियकराच्या सहाय्याने आपला पती संगनगौडा अरहुंशी याचा खून करून त्याचा मृतदेह अनमोड येथील जंगलात फेकल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेली गदग (कर्नाटक) येथील मयताची पत्नी लक्ष्मी अरहुंशी हिच्यासह सुरेश पुजार, जगदीश दोडामणी व मुतण्णा अनवलाड या चार जणांवरील खुनाचा गुन्हा सिद्ध न झाल्याने दक्षिण गोव्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश राम प्रभूदेसाई यांनी सर्वांची निर्दोष मुक्तता केली.

या प्रकरणात लक्ष्मी आणि सुरेश पुजार यांच्यावतीने ॲड. रोहन देसाई, जगदीश दोडामणी यांच्यावतीने ॲड. अमरनाथ देसाई, तर मुतण्णा अनवलाड यांच्यावतीने ॲड. स्पेन्सर व्हिएगस यांनी बाजू मांडली. राज्याच्यावतीने सरकारी वकील ज्योतीन ठक्कर यांनी बाजू मांडली.

या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, १७ जानेवारी २०१९ रोजी अनमोड घाटावर पिकनिकसाठी आलेल्या काही युवकांना खाली खाडीत एक मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी कुळे पोलिसांना पाचारण केल्यानंतर कुणीतरी या इसमाचा दोरीने गळा आवळून खून करून त्याचा मृतदेह खाडीत टाकल्याचे आढळून आले होते.

संशयाचा फायदा

या प्रकरणी पोलिसांना मयताचा गळा आवळून खून केल्याचा दावा न्यायालयात सिद्ध करता आला नाही. तसेच ॲसिडचा वापर केला गेल्याचेही सिद्ध झाले नाही. त्यामुळे संशयाचा फायदा देत न्या. प्रभूदेसाई यांनी सर्वांची निर्दोष मुक्तता केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT